Jalgoan Crime : जळगावात 'मुळशी पॅटर्न'! किरकोळ वादातून गोळीबाराची घटना, आकाश उर्फ टपऱ्या बाविस्करचा मृत्यू

Last Updated:

Jalgoan Crime News : जळगाव शहराच्या शनिपेठ परिसरातील कांचननगर भागात काल रात्री अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन तरुणांमधील एका किरकोळ वादामुळे ही परिस्थिती उद्भवली.

News18
News18
Jalgoan Crime News : जळगाव शहराच्या शनिपेठ परिसरातील कांचननगर भागात काल रात्री अचानक तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन तरुणांमधील एका किरकोळ वादामुळे ही परिस्थिती उद्भवली. हा वाद इतका वाढला की, तातडीने पोलिसांचा कडक बंदोबस्त या भागात तैनात करावा लागला. रविवारी रात्री किरकोळ वादातून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.

तरुणाचा गोळी लागून मृत्यू

या घटनेत आकाश उर्फ टपऱ्या युवराज बाविस्कर या तरुणाचा गोळी लागून मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका चिघळला की त्याचे रूपांतर गोळीबारात झालं आणि यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
advertisement

परिसरात कडक बंदोबस्त

या गोळीबारात जखमी झालेल्या तिघांवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवत आकाश उर्फ डोया नावाच्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला असून, सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
advertisement
दरम्यान, जळगावातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली होती. जळगावच्या धरणगाव (Dharangaon) शहरातील सत्यनारायण चौकात पेट्रोल चोरीच्या संशयावरून हटकल्याने मोठा वाद उफाळून आला होता. अशातच या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण होतें. भूषण सुरेश भागवत या तरुणावर साई कासार, तुषार उर्फ मुन्ना नेरपगार आणि क्रिश राठोड या तिघांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgoan Crime : जळगावात 'मुळशी पॅटर्न'! किरकोळ वादातून गोळीबाराची घटना, आकाश उर्फ टपऱ्या बाविस्करचा मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement