advertisement

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भयंकर घटना! लोंखडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Last Updated:

Truck Fire News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईकडे लोखंडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रकला आज सकाळी 10 वाजता अचानक आग लागली. ही घटना आडोशी बोगद्याजवळ घडली असून त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली आहे.

News18
News18
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिथे पुण्याहून मुंबईकडे लोखंडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रकला आज सकाळी 10 वाजता अचानक आग लागली. एक्सप्रेसवरील आडोशी बोगद्याजवळ ही घटना घडली असून वाहतुकीवर तात्पुरता परिणाम झाला आहे.
बई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण प्रसंग
मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक पुण्याहून मुंबईकडे जात होता. दरम्यान आग लागल्याचे कळताच प्रसंगवधान राखत चालकाने ट्रक महामार्गावरील शेवटच्या लेंनवर आणला. त्यानंतर त्यानेही आगीतून आपली सुखरूप सुटका केली काही क्षणातच आगीने रोद्र रूप धारण केलेत्यामुळे ट्रक ची समोरील केबिन दर्शनी भाग पूर्णपणे जळून राख झाला आहे.
आगीची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा त्यासोबतच महामार्गावरील क्यूआरटी टीम महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळावर दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून अर्ध्या तासात आग विझवली.परंतु, संबंधित घटनेवेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे थांबविण्यात आली होती त्यामुळे एक्सप्रेस वेळेवर मुंबई लेनला मोठी वाहतूक कोंडी झाली होती जवळपास चार ते पाच किलोमीटर वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या ट्रकला आग नेमक्या कुठल्या कारणामुळे लागली याचा तपास महामार्ग पोलीस करत आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भयंकर घटना! लोंखडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement