तांदूळ विकत घेताना तुम्हीही ही चूक करता का? 'नवीन' नव्हे, 'जुना' तांदूळच आहे खरा 'खजिना'! वाचा फायदे
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
विचार करा, आपण बाजारात जातो, सुपरमार्केटच्या रॅकमधून तांदळाचं एक चकचकीत पॅकेट उचलतो. पण आपण कधी विचार करतो की हा तांदूळ 'नवीन' आहे की 'जुना'? बहुधा नाही. पण...
विचार करा, आपण बाजारात जातो, सुपरमार्केटच्या रॅकमधून तांदळाचं एक चकचकीत पॅकेट उचलतो. पण आपण कधी विचार करतो की हा तांदूळ 'नवीन' आहे की 'जुना'? बहुधा नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, आयुर्वेदात नेहमी 'जुना' तांदूळ खाण्याची शिफारस केली जाते. फक्त आयुर्वेदच नाही, आठवून बघा... आपल्या आजीच्या स्वयंपाकघरातला तो एक अलिखित नियम. आई नेहमी नवीन तांदूळ आणून आधी तो नीट साठवून ठेवायची आणि जुनाच डबा शिजवण्यासाठी बाहेर काढायची. हा निव्वळ योगायोग नव्हता, तर त्यामागे एक ठोस कारण होतं.
महागडा, मोकळा भात म्हणजे 'जुना' तांदूळ!
तुम्ही कधी पाहिलंय, जो तांदूळ शिजल्यावर मस्त 'मोकळा' आणि 'फुलणारा' (fluffy) होतो, त्याची किंमत नेहमीच जास्त असते? हॉटेलमध्ये किंवा बिर्याणीसाठी जो बासमती वापरला जातो, तो हाच 'जुना' साठवलेला तांदूळ असतो. तो जुना असतो, म्हणूनच त्याचा पोत (texture) आणि चव दोन्हीही नवीन तांदळापेक्षा सरस ठरतात. तो साठवण्यासाठी जो खर्च येतो, त्यामुळेच त्याची किंमतही जास्त असते.
advertisement
पण हा हट्ट का? या 'जुने ते सोने' म्हणण्यामागे चव आणि पोत तर आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आरोग्याची ५ मोठी कारणे यात दडलेली आहेत.
जुना तांदूळ खाण्याचे ५ जबरदस्त फायदे:
१. पोटासाठी हलका (पचनासाठी उत्तम): आयुर्वेदिक तज्ज्ञ तन्मय गोस्वाल स्पष्ट करतात की, जो तांदूळ एक ते दोन वर्ष जुना होतो, तो पचायला अत्यंत हलका (easily digestible) बनतो. याउलट, नवीन तांदूळ हा 'चिकट' (oily) आणि पचायला जड असतो. आजी नेहमी म्हणायची, "तांदूळ जितका जुना, तितका तो शरीरासाठी हलका."
advertisement
२. स्टार्च कमी, चिकटपणा कमी: तांदूळ जसजसा जुना होतो, त्यातील स्टार्चचे प्रमाण (low starch) कमी होत जाते. यामुळेच जुन्या तांदळाचा भात एकमेकांना चिकटत नाही. त्याचा पोत बिघडत नाही आणि तो खातानाही आनंददायी वाटतो.
३. मधुमेहींसाठी वरदान (Low Glycemic Index): हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जुन्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index) नवीन तांदळापेक्षा बराच कमी असतो. याचा अर्थ, हा तांदूळ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. म्हणूनच, मधुमेही रुग्ण (diabetics) किंवा वजन कमी (weight loss) करू पाहणारे लोक नवीन तांदळाऐवजी जुना तांदूळ आरामात खाऊ शकतात.
advertisement
४. बनतो मोकळा आणि फुलणारा: जुन्या तांदळाचा भात शिजवणे सोपे असते. तो पटकन शिजतो आणि प्रत्येक दाणा मोकळा व फुललेला दिसतो, ज्यामुळे भाताची रंगतच वाढते. म्हणूनच बिर्याणी किंवा पुलावसाठी जुना बासमती तांदूळच (Basmati Old Rice) वापरला जातो.
५. आणि हो... तो खराब होत नाही! आता प्रश्न पडेल की तांदूळ किती जुना खावा? तो खराब होत नाही का? यूएस फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशनच्या मते, जर तांदूळ कोरड्या, थंड आणि हवाबंद डब्यात (airtight container) ठेवला, तर तो खराब होण्यापासून वाचतो. इतकेच काय, बीबीसीच्या (BBC) एका अहवालानुसार, यूएस राईस फेडरेशन (US Rice Federation) म्हणते की, योग्यरित्या साठवलेला तांदूळ "जवळजवळ अनिश्चित काळासाठी" (almost indefinitely) वापरण्यायोग्य राहतो!
advertisement
हे ही वाचा : Health Tips : हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका? आहारात हे पदार्थ करा समावेश, राहाल तंदुरुस्त
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 20, 2025 8:27 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तांदूळ विकत घेताना तुम्हीही ही चूक करता का? 'नवीन' नव्हे, 'जुना' तांदूळच आहे खरा 'खजिना'! वाचा फायदे