धोक्याची घंटा! या ४ गोष्टींकडे दुर्लक्ष केलंत, तर हृदयविकार आहे अटळ, तज्ज्ञ म्हणतात...

Last Updated:

आजकाल 'अचानक' हृदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा स्ट्रोक (Stroke) आल्याच्या बातम्यांनी आपण सुन्न होतो. धावपळीची जीवनशैली आणि...

Heart Disease
Heart Disease
आजकाल 'अचानक' हृदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा स्ट्रोक (Stroke) आल्याच्या बातम्यांनी आपण सुन्न होतो. धावपळीची जीवनशैली आणि बदललेल्या सवयींमुळे हे प्रमाण झपाट्याने वाढले आहे, हेही खरे. पण 'अचानक' आलेला हा झटका, खरंच एका रात्रीत घडतो का? की त्याची मुळं शरीरात आधीच खोलवर रुजलेली असतात?
याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी नुकताच अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये एक महा-अभ्यास करण्यात आला. तब्बल ९० लाखांहून अधिक लोकांच्या आरोग्याचा अभ्यास केल्यानंतर, संशोधकांना एक आश्चर्यकारक पण तितकाच महत्त्वाचा निष्कर्ष सापडला.
अभ्यासाचा खुलासा: ९९% हल्ल्यांमागे फक्त चार 'खलनायक'!
या संशोधनात असे आढळून आले की, जगात होणाऱ्या ९९ टक्के हृदयविकाराच्या झटक्यांमागे आणि स्ट्रोकमागे केवळ चार प्रमुख 'खलनायक' जबाबदार आहेत. होय, फक्त चार! ही कारणे अनेकदा आपल्या शरीरात आधीपासूनच अस्तित्वात असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.
advertisement
कोण आहेत हृदयाचे हे चार मुख्य शत्रू?
हृदयविकार आणि स्ट्रोकची अनेक कारणे असली तरी, या अभ्यासात आढळलेले सर्वात सामान्य चार धोके खालीलप्रमाणे आहेत:
  1. उच्च रक्तदाब (High Blood Pressure)
  2. वाढलेलं कोलेस्टेरॉल (High Cholesterol)
  3. वाढलेली रक्तातील साखर (High Blood Sugar)
  4. धूम्रपान (Smoking - मग ते तुम्ही पूर्वी करत असाल किंवा सध्या करत असाल)
  5. advertisement
    याचा सरळ अर्थ असा की, जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हे चार शत्रू ठाण मांडून बसले असतील, तर त्यांना हृदयविकाराचा धोका इतरांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असतो. धक्कादायक बाब म्हणजे, ६० वर्षांखालील महिलांमध्येही ९५ टक्क्यांहून अधिक प्रकरणांचा संबंध याच घटकांशी जोडलेला होता.
    सर्वात मोठा धोका: 'सायलंट किलर' रक्तदाब
    या चारही धोक्यांमध्ये, 'उच्च रक्तदाब' हा सर्वात मोठा आणि सर्वात धोकादायक घटक असल्याचे सिद्ध झाले. अमेरिका आणि दक्षिण कोरिया, दोन्ही ठिकाणच्या ९३ टक्क्यांहून अधिक रुग्णांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्यापूर्वीच उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
    advertisement
    तज्ज्ञांचा गंभीर इशारा: "मोठ्या आजाराची वाट पाहू नका"
    नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे हृदयविकार तज्ज्ञ फिलिप ग्रीनहॅन्ड यांच्या मते, "हा अभ्यास स्पष्टपणे दाखवतो की, जर एखाद्या व्यक्तीला यापैकी एक किंवा अधिक घटक असतील, तर भविष्यात गंभीर हृदय समस्या येणे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे या घटकांवर नियंत्रण ठेवण्यावरच आपले खरे लक्ष केंद्रित केले पाहिजे."
    advertisement
    अनेकदा असा गैरसमज असतो की, कोणताही धोकादायक घटक नसतानाही हृदयविकार होत आहे. मात्र, ड्यूक युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञ डॉ. नेहा पागिडीपती यावर जोर देत म्हणतात, "आपण अधिक सजग व्हायला हवे. मोठ्या आजाराची किंवा अटॅकची वाट न पाहता, सुरुवातीच्या टप्प्यातच हे धोक्याचे घटक ओळखून त्यांचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे."
    पण, एक चांगली बातमी!
    advertisement
    ही कहाणी घाबरवण्यासाठी नाही, तर सावध करण्यासाठी आहे. यातली सर्वात चांगली बातमी ही आहे की, हे चारही शत्रू आपल्या नियंत्रणात येऊ शकतात. योग्य आहार, नियमित व्यायाम, धूम्रपानासारख्या व्यसनांपासून पूर्णपणे दूर राहणे आणि नियमित आरोग्य तपासणी, या चतुःसूत्रीने आपण हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. गरज आहे ती फक्त, शरीराने दिलेले छोटे इशारे ओळखून वेळीच जागे होण्याची!
    advertisement
    view comments
    मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
    धोक्याची घंटा! या ४ गोष्टींकडे दुर्लक्ष केलंत, तर हृदयविकार आहे अटळ, तज्ज्ञ म्हणतात...
    Next Article
    advertisement
    OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
    2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
      View All
      advertisement