advertisement

बड्या रुग्णालयात मोठा कांड! हेल्दी लोकांची Heart Surgery, हृदयात टाकले स्टेंट; 800 जणांचं ऑपरेशन

Last Updated:

Heart Hospital PMJAY scam : गेल्या दीड वर्षात या रुग्णालयातील एका डॉक्टरने तब्बल 800 शस्त्रक्रिया केल्याचं समोर आलं आहे. याच आकड्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
अहमदाबाद : डॉक्टर म्हणजे रुग्णांसाठी देव... डॉक्टर जे काही सांगतात त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवायचा... पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत आहेत काही डॉक्टर. असाच एक डॉक्टर ज्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ केला आहे. त्याने इतका मोठा कांड केला आहे की आरोग्य विभागही हादरलं आहे. त्याचं कृत्य समोर येताच एकच खळबळ उडाली आहे.
गुजरातमधील एका हॉस्पिटपलमधील धक्कादायक समोर आला आहे. हेल्दी लोकांची हार्ट सर्जरी केली गेली. गरज नसताना या लोकांच्या हृदयात स्टेंट टाकले आहेत. गेल्या दीड वर्षात तब्बल 800 शस्त्रक्रियांची नोंद झाली.  याच आकड्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.
advertisement
जामनगरच्या जेसीसी हार्ट इन्स्टिट्यूटमधील हा प्रकार आहे. इथं दीड वर्षात 800 शस्त्रक्रिया आणि त्याचं एकूण 6 कोटी रुपये बिल झालं. या शस्त्रक्रिया प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केल्याचं सांगत हे बिल आरोग्य विभागाला पाठवण्यात आलं. पण शस्त्रक्रियेचा आकडा आणि बिल पाहून काहीतरी गडबड असल्याचा संशय आरोग्य विभागाला आला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला.
advertisement
प्राथमिक तपासणीत धक्कादायक माहिती उघड झाली. अशा 105 लोकांना स्टेंट बसवलं, जे पूर्णपणे निरोगी होते. डॉ. पार्श्व वोराने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्याचा आरोप आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे पैसे लाटण्यासाठी हा प्रकार करण्यात आला. रुग्णालयाच्या इतर संचालक आणि भागीदारांना काही कळू नये म्हणून त्याने आयुष्मान कार्ड लाभार्थ्यांच्या ऑनलाईनसह सर्व प्रवेश प्रक्रियेची माहिती स्वत:कडेच ठेवल्याचा आरोप आहे. औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना रुग्ण पाठवल्याबद्दल 20% कमिशन दिलं जातं, असंही तपासात समोर आलं आहे.
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार आता या रुग्णालयाला प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून काढून टाकण्यात आलं आहे, तसंच 6 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. डॉक्टरलाही निलंबित केल्याची माहिती आहे.
याआधी अहमदाबादमधील ख्याती रुग्णालयातही आयुष्मान योजनेचा असा घोटाळा समोर आला होता. हॉस्पिटलने 19 लोकांची जबरदस्ती अँजिओग्राफी केली. 7 लोकांवर अँजिओप्लास्टी केली त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर 5 आयसीयूमध्ये आहेत.
advertisement
PMJAY शी संबंधित आणखी दोन रुग्णालयांवरही कारवाई करण्यात आली आहे. पालनपूरमधील सद्भावना रुग्णालयाला पॅनेलमध्ये नसलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला. तर जुनागढमधील समन्वय रुग्णालयाला ठरलेल्या पॅकेजपेक्षा जास्त पैसे आकारल्याने 50000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
बड्या रुग्णालयात मोठा कांड! हेल्दी लोकांची Heart Surgery, हृदयात टाकले स्टेंट; 800 जणांचं ऑपरेशन
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement