Pressure Cooker Rasgulla Recipe : प्रेशर कुकरमध्ये रसगुल्ला तयार करण्याची एकदम सोपी ट्रिक, 15 मिनिटात खायला तयार

Last Updated:

Rasgulla Recipe In Pressure Cooker :  ना गोंधळ, ना वेळ खाऊ प्रक्रिया करता या नव्या पद्धतीने फक्त काही मिनिटांत तुम्ही गरमागरम, नरम आणि स्पंजी रसगुल्ले तयार करू शकता. सणासुदीला घरी झटपट गोड खायचं असेल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : गोड खाण्याचे मन झालं की, सर्वात आधी आठवतो तो म्हणजे रसगुल्ला. पश्चिम बंगालची ही खास मिठाई आता केवळ बंगालपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर संपूर्ण भारतात ती ओळखली जाते आणि खाल्ली ही जाते. मात्र पारंपरिक पद्धतीने रसगुल्ला बनवणं म्हणजे खूप वेळ आणि मेहनत यांची गरज असते. पण सध्या सोशल मीडियावर एक अशी रेसिपी व्हायरल झाली आहे, ज्यात केवळ प्रेशर कुकर वापरून झटपट आणि स्वादिष्ट रसगुल्ले घरी तयार करता येतात.
ना गोंधळ, ना वेळ खाऊ प्रक्रिया करता या नव्या पद्धतीने फक्त काही मिनिटांत तुम्ही गरमागरम, नरम आणि स्पंजी रसगुल्ले तयार करू शकता. सणासुदीला घरी झटपट गोड खायचं असेल, तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे.
रसगुल्ला तयार करण्यासाठी लागणारं साहित्य:
फुल क्रीम दूध – 1 लिटर
व्हिनेगर – 1 ते 2 चमचे
advertisement
भाजलेला रवा (सूजी) – 1 चमचा
वेलची पूड – अर्धा चमचा
साखर – 3 कप
रसगुल्ला तयार करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया:
1. दूध फाडणे
प्रथम एका मोठ्या पातेल्यात दूध गरम करत ठेवा. दूध उकळू लागल्यावर त्यात थोडं थोडं करत व्हिनेगर टाका. दूध फाटल्यावर गॅस बंद करा.
2. फाटलेलं दूध गाळून घ्या
फाटलेलं दूध स्वच्छ कापडात गाळा आणि थंड पाण्याने 2-3 वेळा धुवा. त्यामुळे व्हिनेगरचा उग्र वास निघून जाईल. हे मिश्रण अर्धा तास कुठेतरी लटकवत ठेवा, जेणेकरून पाणी पूर्ण निघून जाईल.
advertisement
3. पाक तयार करा
प्रेशर कुकरमध्ये साखर आणि पाणी टाकून पाक उकळायला ठेवा.
4. मऊ गोळा बनवा
फाटलेलं दूध एका भांड्यात काढा. त्यात भाजलेला रवा आणि वेलची पूड टाकून चांगलं मळा. मिश्रण एकसंध, मऊ आणि चिकटसर होईपर्यंत मळत राहा.
5. गोळे तयार करा
मिश्रणाच्या एकसमान गोळा तयार करा. मग त्याचे आपल्याला पाहिजे त्या आकारात लहान गोळे तयार करा. त्या गोळ्यांना फट पडली नाही पाहिजे किंवा ते फाटले नाही पाहिजे याची काळजी घ्या.
advertisement
6. गोळ्या चाशनीत शिजवा
तयार केलेले गोळे कुकरमधील गरम पाकात टाका. कुकरचं झाकण लावा आणि 2-3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. नंतर गॅस कमी करून अजून 5 मिनिटं ठेवून द्या.
7. कुकर थंड झाल्यावर रसगुल्ले तयार!
गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्या. शिट्टी निघाल्यावर झाकण उघडा, तुमचे नरम, रसाळ स्पंजी रसगुल्ले तयार आहेत.
advertisement
विशेष टिप्स:
पाकात गुलाब जल किंवा केशर घातल्यास सुगंध आणि चव वाढते.
फाटलेल्या दूधाला स्वच्छ धुणं महत्त्वाचं आहे, अन्यथा रसगुल्ले आंबट लागू शकतात.
ही पद्धत खूप सोपी आहे आणि वेळेची बचत करते. यंदाच्या सणासुदीला, किंवा कुठल्याही खास दिवशी, ही कुकर रसगुल्ला रेसिपी ट्राय करून बघा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pressure Cooker Rasgulla Recipe : प्रेशर कुकरमध्ये रसगुल्ला तयार करण्याची एकदम सोपी ट्रिक, 15 मिनिटात खायला तयार
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement