Face Yoga Truth : काय सांगता? फेस योगामुळे चेहऱ्यावर येऊ शकतात सुरकुत्या! तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Does face yoga really beneficial : बरेच लोक फेस योगा करण्याला प्राधान्य देतात. फेस योगामुळे चेहरा चांगल्या शेपमध्ये राहतो आणि टाईट राहतो, असं अनेकांचं मत आहे.
मुंबई : आपली स्किन हेल्दी, ग्लोइंग आणि टाईट राहावी यासाठी आपण खूप काळजी घेत असतो. अनेक प्रकारचे ब्युटी प्रोडक्टस आपण चेहऱ्यावर लावतो. वयानुसार चेहऱ्याची टाइटनेस कमी होते, चेहरा सैल पडू लागतो. अशावेळी बरेच लोक फेस योगा करण्याला प्राधान्य देतात. फेस योगामुळे चेहरा चांगल्या शेपमध्ये राहतो आणि टाईट राहतो, असं अनेकांचं मत आहे.
फेस योगा किती फायदेशीर आहे याबद्दल अनेक लोक बोलतात. मात्र डॉक्टर तन्वी वैद्य यांचं मत जरा वेगळं आहे. त्यांच्यामते फेस योगा केल्याने तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसानही होऊ शकते. याबद्दल त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर माहिती दिलीय.
डर्माटोजिस्टचं मत काय..
डॉ तन्वी यांच्यामते, फेस योगा तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या बनण्याचं कारण ठरू शकतो. त्यांनी पुढे सांगितलं, फेस योगामध्ये दोन भाग असतात. त्यातला पहिला असतो मसाज आणि दुसरा म्हणजे एक्सरसाइज. यातला जो मसाज पार्ट आहे, तो तुम्ही करू शकता. याचे काही नुकसान नाही. मसाज केल्याने चाऱ्यावरचे लिंफॅटिक ड्रेनेज वाढते. म्हणजे चेहऱ्यावर जर पफीनेस असेल सकाळी सकाळी सूज येत असेल, तर मसाज केल्याने ती कमी होऊ शकते.
advertisement
मात्र जो दुसरा भाग आहे, एक्सरसाइजचा तो थोडासा तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो. कारण यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. डॉ. तन्वी यांच्यामते, आपण जेव्हा चेहऱ्याच्या मसल्स ओव्हरयूज करतो म्हणजे जास्त वापरतो तेव्हा आपल्याला सुरकुत्या येतात. उदाहरणार्थ आपण सारख्या भुवया उंचावत असू तर आपल्या कपाळावर हळूहळू रेषा पडू लागतात, आपण खूप जास्त हसत असलो तर आपल्याला गालावर रेषा पडतात. या रेषा तात्पुरत्या दिसतात.
advertisement
पण जेव्हा आपण खूप काळ असे करत असतो. तेव्हा हसताना, भुवया उंचावताना जेव्हा रेषा पडतात, वरची स्किन फोल्ड होते आणि स्किनमध्ये क्रिझेस येतात. यामुळे कालांतराने त्या लाईन्स कायमच्या पडू लागतात. म्हणजे जेव्हा तुम्ही काहीच चेहऱ्याचे हावभाव करत नसलात तरीही त्यात लाईन्स दिसतात. हे लाईन्सचं स्टॅटिक कन्व्हर्जन आपण जेव्हा लासलस ओव्हरयूज करतो तेव्हा होतं.
advertisement
advertisement
फेस योगामध्ये आपण याचा मसल्सची एक्सरसाइज करतो म्हणजेच त्या ओव्हरयूज करतो. जेव्हा आपल्याला चेहऱ्याला त्याची काहीही गरज नसते तेव्हा आपण फेस योगा करतो आणि मसल्स ओव्हरयूज केल्यामुळे लाईन्स डीप होत जातात. कालांतराने चेहऱ्यावर त्या सुरकुत्यांसारख्या दिसू लागतात. त्यामुळे फेस योगा फारसा फायदेशीर नाही, असं डॉ तन्वीचं मत आहे.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 26, 2026 4:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Face Yoga Truth : काय सांगता? फेस योगामुळे चेहऱ्यावर येऊ शकतात सुरकुत्या! तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती









