advertisement

YouTubeचं मोठं गिफ्ट! आता 2 महिने मोफत पाहा Ad फ्री व्हिडिओ, फक्त करा 'हे' काम

Last Updated:

YouTube Premium Free Offer: जास्तीत जास्त लोक मोबाईल यूट्यूब अवश्य पाहतात. अशावेळी यूट्यूबचं प्रीमियम सब्सक्रिप्शन तुम्हाला फ्री मिळालं तर? हे खरं होतंय कारण आता यूट्यूब 2 महिन्यांसाठी हे सब्सक्रिप्शन फ्रीज देतेय.

युट्यूब प्रीमियम फ्री
युट्यूब प्रीमियम फ्री
मुंबई : आपल्यापैकी बरेज जणं हे काहीना काही कारणांसाठी यूट्यूबचे व्हिडिओज पाहतोच. कधी एंटरटेनमेंटसाठी पाहतो, तर कधी काही शिकण्यासाठी पाहत असतो. पण हे पाहत असताना यात येणाऱ्या जाहिराती या खुप डिस्टर्ब करतात. पण हा प्रॉब्लम आता दूर होऊ शकतो. अगदी दोन महिने तुम्हाला यूट्यूबवर कोणत्याही जाहिराती दिसणार नाही.
जगातील लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबने आपल्या यूझर्ससाठी धमाकेदार ऑफर आणलीये. या ऑफर अंतर्गत तुम्ही YouTube Premium चा आनंद अगदी 2 महिने फ्रीमध्ये घेऊ शकता. YouTube Premium हे एक किंवा दोन आठवड्यांसाठी फ्री ट्रायल देत असते. पण आता या ऑफरमुळे तुम्हाला चक्क 2 महिने जाहिरात फ्री व्हिडिओ पाहता येतील. यात तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागणार नाहीये. या ऑफरविषयी जाणून घेऊया.
advertisement
यात काय सुविधा मिळतील?
YouTube Premium च्या फ्री ट्रायलमध्ये पेड सब्सक्रायबर्सला मिळणारे सर्व फीचर्स मिळतील.
  • Ad-free Videos तुम्हाला पाहता येणार आहेत.
  • मोबाईलमध्ये दुसरे अ‍ॅप्स चालवताना किंवा स्क्रीन लॉक झाल्यावरही व्हिडिओ आणि म्यूझिक चालू राहील.
  • व्हिडिओ Full HD क्वालिटी मध्ये डाउनलोड करुन नंतर पाहण्याची सुविधा मिळेल.
  • YouTube Music चं फ्री अ‍ॅक्सेस तुम्हाला मिळेल.
advertisement
ऑफर कशी मिळवायची?
  • सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनमध्ये YouTube अ‍ॅप ओपन करा.
  • खाली उजव्या बाजूला दिलेल्या You टॅब म्हणजेच प्रोफाइल आयकनवर क्लिक करा.
  • खाली स्क्रॉल केल्यावर तुम्हाला Get YouTube Premium चा ऑप्शन मिळेल. त्यावर टॅप करा.
  • तुम्ही या ऑफरसाठी एलिजिबल असाल तर तिथे  2 months freeचं बॅनर दिसेल.
  • आता Try 2 months for 0 वर क्लिक करा.
advertisement
या गोष्टी ठेवा लक्षात
आपले पेमेंट डिटेल्स म्हणजेच यूपीआय किंवा कार्ड भरा. ट्रायल संपल्यानंतर तुम्ही हे कधीही कॅन्सल करू शकता. ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील. तुम्ही केलं नाही तर दोन महिन्यानंतर तुम्हाला तिसऱ्या महिन्याची YouTube Premium ची फीस द्यावी लागेल. ही फीस तुमच्या अकाउंटमधून कट होईल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
YouTubeचं मोठं गिफ्ट! आता 2 महिने मोफत पाहा Ad फ्री व्हिडिओ, फक्त करा 'हे' काम
Next Article
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement