Cake कच्चा राहणार नाही, क्रॅकही होणार नाही! वापरा सोप्या टिप्स
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
बाजारात विविध प्रकारचे केक उपलब्ध असतात, अगदी आपल्याला हवा तसा केक मिळतो. घरीसुद्धा आपण एकदम टेस्टी केक बनवू शकतो.
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : पूर्वी फक्त वाढदिवसाला केक कापले जायचे, आता मात्र कोणताही आनंदाचा क्षण आपण केक कापून साजरा करतो. बाजारात विविध प्रकारचे केक उपलब्ध असतात, अगदी आपल्याला हवा तसा केक मिळतो. घरीसुद्धा आपण एकदम टेस्टी केक बनवू शकतो. पूर्वी ओव्हनशिवाय केक बनवणं अवघड होतं, आता मात्र अनेकजण कूकरमध्ये एकदम परफेक्ट केक बनवतात.
advertisement
आज आपण सध्या ट्रेंडिंग असलेला ट्रेनचा केक घरी कसा बनवायचा हे पाहणार आहोत. कल्पना वाघ यांनी ही रेसिपी सांगितली आहे. तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा शेजारच्या, ओळखीच्या लहान मुलाचा वाढदिवस असेल तर हा केक नक्की ट्राय करा. तसंच त्यापुढे परफेक्ट केकसाठी काही खास टिप्सही दिलेल्या आहेत.
advertisement
साहित्य :
1. चॉकलेट स्पोंज - 2
2. व्हीपिंग क्रीम
3. शुगर सिरप
4. फूड जेल कलर - नारंगी / हिरवा
5. सजावटीसाठी साहित्य
6. आयताकृती बोर्ड
7. पाईपिंग बॅग
8. नोझल
9. ब्लेंडर
कृती :
1. सर्वप्रथम दोन्ही स्पाँजचे एकसारखे तीन लेअर करून घ्या.
2. ब्लेंडरच्या सहाय्याने व्हिपिंग क्रीम 2-3 मिनिटं फेटा.
advertisement
3. स्पोंजच्या प्रत्येक लेअरवर आधी शुगर सिरप आणि मग फेटलेली क्रीम लावा. पॅलेट नाईफने दोन्ही केक वेगवेगळे संपूर्ण कव्हर करा.
4. कलर क्रीमसाठी त्यात कलरचे 2-3 ड्रॉप मिसळा.
5. दोन्ही केक आयसिंग करून फ्रीजमध्ये अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवा.
6. अर्ध्या तासाने मोठ्या केकचे दोन समान भाग करून त्यामध्ये ट्रेन ट्रॅक ठेवता येईल अशाप्रकारे ते आयताकृती बोर्डवर ठेवा.
advertisement
7. ट्रेन ट्रॅक ठेवल्यानंतर दुसरा छोटा केक मोठ्या केकवर ठेवा.
8. तुमच्या आवडीप्रमाणे नोझलच्या मदतीने केकवर डिझाईन करून घ्या.
9. सजावटीसाठी आणलेले सर्व साहित्य केकवर लावून नंतर ट्रेन ट्रॅकवर ठेवून सुरू करा.
अशाप्रकारे तुमचा रनिंग ट्रेन थीम केक रेडी होईल.
advertisement
परफेक्ट केक बनवण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा :
- केक बनवण्यासाठी वापरत असलेला मैदा फ्रेश असायला हवा.
- साखर मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून चाळणीने दोन ते तीन वेळा चाळून मगच वापरा.
- मैद्याचं बॅटर एकाच दिशेने फेटा, त्यामुळे केक व्यवस्थित फुलतो.
- केक बेक करण्यापूर्वी ओव्हन प्रीहीट करा जेणेकरून तापमान समान राहील.
advertisement
- बेकिंग डिशमध्ये जराही ओलावा नसावा. त्यासाठी ती चांगली कोरडी करा, नाहीतर केक फुलणार नाही.
- केकमध्ये दूध वापरायचं असेल तर ते हलकं कोमट असायला हवं.
- केकचं मिश्रण एक दिवस आधी फेटून बाजूला ठेवा.
- केकमध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर प्रमाणापेक्षा जास्त वापरू नका, नाहीतर केक क्रॅक होईल.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 28, 2024 4:57 PM IST