ब्राझील बरबटीपासून बनवलेला वडा कधी खाल्ला का? अमरावतीत जाम फेमस video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अमरावतीमधील गिला वडा तर फेमस आहेच त्याचबरोबर पालक आणि मूग वडा सुद्धा तितकाच फेमस आहे. त्यात आणखी एक भर म्हणून अमरावती मधील पूर्णानगर येथे युनिक असा बरबटी वडा सुद्धा बनवला जातो. ज्याची रेसिपी अगदी साधी आणि सरळ आहे.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : अमरावतीमधील गिला वडा तर फेमस आहेच त्याचबरोबर पालक आणि मूग वडा सुद्धा तितकाच फेमस आहे. त्यात आणखी एक भर म्हणून अमरावतीमधील पूर्णानगर येथे युनिक असा बरबटी वडा सुद्धा बनवला जातो. ज्याची रेसिपी अगदी साधी आणि सरळ आहे. मूग वडा बनवताना त्यात इतर अनेक साहित्य वापरतात त्यामुळे तो टेस्टी लागतोच. पण बरबटी वडा बनवताना त्यात फक्त बरबटीची डाळ, मूग किंवा उडीद डाळ, मीठ आणि खाण्याचा सोडा हेच साहित्य वापरले जाते. त्यात लसूण आणि इतर कोणतेही साहित्य वापरले जात नाही. तरीही हा पदार्थ खाण्यासाठी अतिशय रुचकर लागतो. मेळघाटकडे जाणाऱ्या पर्यटकांनी या पदार्थाला खूप पसंती दिली आहे. त्यामुळे पूर्णानगर येथील बरबटी वडा फेमस झालाय.
advertisement
अमरावतीमधील फेमस अन्नपदार्थाबाबत लोकल 18 ने पूर्णानगर येथील संकटमोचन हॉटेलचे संचालक निशांत राऊत यांच्याशी चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, अमरावतीमधील सर्वात फेमस असलेला पदार्थ म्हणजे गिला वडा. अतिशय साध्या पद्धतीने बनवला जातो पण खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो. त्याचबरोबर मूंग आणि पालक वडा. यामध्ये भरपूर साहित्य टाकले जातात. जसे की, पालक, कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, जिरे आणि बरंच काही. त्यामुळे तो अतिशय टेस्टी लागतो आणि आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे.
advertisement
पुढे ते सांगतात की, आमच्या हॉटेलमध्ये वडा बनवण्यासाठी आम्ही ब्राझील बरबटीची डाळ वापरतो. त्याचबरोबर मूग किंवा उडीद डाळ, मीठ आणि खाण्याचा सोडा इतके साहित्य वापरून आम्ही बरबटी वडा बनवतो. यामध्ये बाकी काहीच साहित्य वापरले जात नाही. वडा बनवण्याची पद्धतच या वड्याला चविष्ट बनवते. त्यासोबतच लाल मिरचीची चटणी सुद्धा बरबटी वडा चवदार लागण्यास मदत करते.
advertisement
बरबटी वडा बनवण्यासाठी सर्वात आधी डाळ रात्रभर भिजत घालावी लागते. त्यानंतर सकाळी ती मिक्सर मधून बारीक करून घ्यायची असते. डाळ बारीक करून घेतल्यानंतर अर्धा तास मिश्रण बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर वडे बनवायला घेताना त्यात चवीपुरतं मीठ आणि खाण्याचा सोडा थोडा टाकून घेतो. त्यानंतर हातावर वडे थापून तेलात तळून घेतो, असे सोप्या पद्धतीने बरबटी वडे तयार होतात.
advertisement
अमरावती परतवाडा रोड असल्याने मेळघाटला जाणारे लोकं या आवर्जून इथे थांबतात. कारण आमच्या गावाला पेढ्यांचा गाव म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर नाश्त्यासाठी हा स्पेशल वडा सुद्धा येथे मिळतो. बरबटी वडा आणि इतर नाश्ता हा आतापर्यंत आम्ही 25 रुपये प्लेट या दराने विकत होतो. पण, वाढत्या महागाई मुळे आता 1 जानेवारीपासून 30 रुपये प्लेट अशा दराने आम्ही विक्री करणार आहे, असे निशांत राऊत यांनी सांगितले.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
December 26, 2024 1:58 PM IST