प्रॉन्स कोळीवाडा ते चिकनवडा थाळी, डोंबिवलीतील भरलाय आगरी महोत्सव, 100 रुपयांपासून झणझणीत पदार्थांची मेजवानी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
आगरी महोत्सव वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला महाराष्ट्रातील आगरी कोळी संस्कृतीतील सगळ्या पदार्थांची चव चाखता येणार आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या आकाश पाळण्याची मज्जा सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आगरी 20 वा अखिल भारतीय आगरी महोत्सव डोंबिवलीतील घरडा सर्कल इथे सुरु आहे. या आगरी महोत्सव वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला महाराष्ट्रातील आगरी कोळी संस्कृतीतील सगळ्या पदार्थांची चव चाखता येणार आहे. त्यासोबतच वेगवेगळ्या आकाश पाळण्याची मज्जा सुद्धा तुम्हाला घेता येणार आहे. आगरी समाजातल्या अनेक प्रथा आणि त्यासोबतच गाण्यांची मेजवानी सुद्धा इथे तुम्ही घेऊ शकता.
advertisement
या आगरी महोत्सवामध्ये यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला आगरी कोळी पद्धतीच सगळं जेवण मिळेल. यामध्ये अगदी प्रॉन्स कोळीवाडा पासून ते चिकनवडा थाळीपर्यंत सगळं काही उपलब्ध आहे. चिकन फ्राय, कोळंबी फ्राय, खिमा मसाला, खेकडा मसाला यांची किंमत सुद्धा फक्त 100 ते 150 रुपयांपासून सुरू होते. तुम्हाला जर चिकन थाळी हवी असेल तर त्यामध्ये तुम्हाला भात, वडे, चिकन, चिकन फ्राय, सुका चिकन, कांदा लिंबू हे फक्त 300 रुपयांना मिळेल. या आगरी कोळी पद्धतीच्या पदार्थांना लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या आगरी महोत्सवमध्ये अनेक व्यावसायिक हे गेले 15,16 वर्ष दरवर्षी इथे स्वतःचे व्यवसाय लावतात. त्यामुळे तर त्यांच्या खानावळींना अधिकच मागणी आहे.
advertisement
'आई एकविरा फूड स्टॉल नावाने या आगरी महोत्सवच्या मैदानात मी गेले 17 वर्ष व्यवसाय लावते. अनेक जण आवर्जून वाट काढत माझ्या दुकानात भेट द्यायला येतात. माझ्याकडे चिकन चे 15 हून अधिक प्रकार मिळतात. आगरी कोळी पद्धतीच जेवण हेच माझ वैशिष्टय आहे'असे मंदा पाटील यांनी सांगितले.
advertisement
आगरी महोत्सव फक्त आगरी कोळी जेवणासाठीच नव्हे तर सुक्या मासळी बाजारासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. या बाजारात तुम्हाला इतर कुठेही न मिळणारी ताजे सुकी मच्छी मिळेल. यामध्ये सुरमई, बांगडा, बोंबील, जवळा असं सगळं काही मिळेल. ही सुकी मच्छी थेट वसईतल्या गावावरून आलेली आहे. त्यामुळे ही ताजी मच्छी तुम्हाला अगदी स्वस्त दरात मिळेल.
advertisement
'यंदा आगरी महोत्सवच 20 वं वर्ष आहे. आम्ही गेले 20 वर्ष दरवर्षी वसई वरून इथे सुकी मच्छी विकण्यासाठी येतो. लोकं सुद्धा या 10 दिवसात आमच्या कडूनसुकी मासळी आवर्जुन खरेदी करतात' असे सुक्या मासोळीचा व्यवसाय करणाऱ्या पौर्णिमा यांनी सांगितले.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
December 16, 2024 3:14 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
प्रॉन्स कोळीवाडा ते चिकनवडा थाळी, डोंबिवलीतील भरलाय आगरी महोत्सव, 100 रुपयांपासून झणझणीत पदार्थांची मेजवानी