मार्गशीर्ष महिन्यात उपवासाला बनवा साबुदाणा मिल्कशेक, झटपट तयार होते रेसिपी Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
मार्गशीर्ष महिना सुरू आहे. त्यामुळे अनेक जणी गुरुवारच व्रत करतात. त्यामुळे केळी, दूध आणि साबुदाणे यांचे मिश्रण करून साबुदाणा मिल्कशेक घरीच कसा करायचा? याची रेसिपी डोंबिवली गृहिणी शीतल पाटील यांनी सांगितली आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
डोंबिवली : मार्गशीर्ष महिना सुरू आहे. त्यामुळे अनेक जणी गुरुवारच व्रत करतात. यावेळेला साबुदाण्याची खिचडी खाण्याला अनेक जण प्राधान्य देतात. साबुदाण्याची खिचडी बनवताना तेलाचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे अनेक जणांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे केळी, दूध आणि साबुदाणे यांचे मिश्रण करून साबुदाणा मिल्कशेक घरीच कसा करायचा? याची रेसिपी डोंबिवली गृहिणी शीतल पाटील यांनी सांगितली आहे.
advertisement
साबुदाणा मिल्कशेक बनवण्यासाठी साहित्य
तीन मोठी केळी, एक वाटी दूध, एक वाटी भिजवलेले साबुदाणे, एक वाटी साखर हे साहित्य लागेल.
साबुदाणा मिल्कशेक कृती
सर्वप्रथम केळी व्यवस्थित सोलून बारीक करून घ्या. त्यानंतर केळी आणि भिजवलेले साबुदाणे मिक्सरमध्ये एकत्र करून घ्या. हे केळी आणि भिजवलेले साबुदाणे अगदी बारीक करू नये थोडी भरड ठेवावी. आता एका भांड्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी साखर घेऊन त्यामध्ये दूध घाला आणि साखर आणि दूध व्यवस्थित एकजीर्ण करून घ्या. आता या साखर आणि दुधामध्ये उरलेले भिजवलेले साबुदाणे मिक्स करा. या मिश्रणात आता केळी आणि साबुदाणे यांचा मिक्सरमध्ये केलेलं मिश्रण घाला. पुन्हा सगळं साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्या. साखरेचे प्रमाण हे तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या कारण अनेकांना साखर जास्त लागते तर काहींना कमी. आता सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या.
advertisement
अशा पद्धतीने आपला साबुदाणा मिल्क शेक तयार आहे. हे मिल्कशेक एका ग्लासात ओतून तुम्ही यावर बारीक केलेले केळ्याचे तुकडे घालू शकता. उपवासाच्या दिवसांमध्ये तेलकट खाल्ल्यामुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे साबुदाणा खिचडी ऐवजी या दिवसांमध्ये तुम्ही जर साबुदाणा मिल्कशेक घ्याल, तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
December 16, 2024 10:48 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
मार्गशीर्ष महिन्यात उपवासाला बनवा साबुदाणा मिल्कशेक, झटपट तयार होते रेसिपी Video