आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या मेथीपासून दिवाळीसाठी कशी बनवावी शंकरपाळी? बनवण्याची पद्धत पाहा

Last Updated:

दिवाळीसाठी मेथी सारख्या आरोग्य लाभ गुणकारी भाजी पासून शंकरपाळी कशी बनवावी पाहा

+
News18

News18

वर्धा, 10 नोव्हेंबर : दिवाळी म्हटलं की फराळ हा आलाच. घरोघरी चिवडा, चकली, लाडू, शंकरपाळी अशा प्रकारचे अनेक चमचमीत पदार्थ बनविले जात आहेत. यातला शंकरपाळी हा पदार्थ म्हणजे अनेकांना अत्यंत आवडीचा. गोड आणि खारे अशा प्रकारचे शंकरपाळे सहसा बनविले जातात. मात्र यामध्ये देखील काही वेगळ्या प्रकारची टेस्ट आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम तुम्हाला खायला मिळाल तर? भारीच ना! यामुळे दिवाळीसाठी मेथी सारख्या आरोग्य लाभ गुणकारी भाजी पासून शंकरपाळी कशी बनवावी याबद्दल वर्धा येथील दर्शना काळे यांनी रेसिपी सांगितली आहे.
मेथीपासून शंकरपाळी बनवण्यासाठी लागणार साहित्य :
1. एक वाटी कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचे पीठ
2. एक वाटी तांदळाचे पीठ
( या पिठाच्या जागी तुम्ही मैदा ही वापरू शकता. मी हेल्दी शंकरपाळे बनवीत असल्यामुळे पचनास जड असलेला मैदा वापरलेला नाही.)
3. धनेपूड,जिरेपूड,तिखट,हळद,मीठ हे मसाले
4. तळण्यासाठी तेल
5). स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतलेली मेथी
advertisement
मेथीपासून शंकरपाळी बनवण्यासाठी कृती:
सर्वप्रथम एका भांड्यात हिरवी बारीक चिरून घेतलेली मेथी त्यात एक वाटी तांदळाचे पीठ एक वाटी कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचे पीठ त्यात धने पूड, जिरे पूड ,तिखट ,हळद,मीठ हे चवीनुसार ॲड करायचे आहे. त्यानंतर दोन छोटे चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन ॲड करायचा आहे. आता हे मिश्रण छान एकत्र करून घेतल्यानंतर थोड्या थोड्या पाण्याच्या साह्याने घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे. आता हा गोळा जास्त जाडही नाही आणि पातळही नाही अशा प्रमाणात लाटून घ्यायचा आहे. त्यानंतर शंकरपाळे च्या आकाराचे काप करून घ्यायचे आहे. आणि गरम तेलामध्ये हे शंकरपाळी लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत.कुरकुरीत शंकरपाळी खाण्यासाठी तयार आहेत,असं दर्शना काळे यांनी सांगितले आहे.
advertisement
बेसनचे लाडू बिघडतात? या सिक्रेट टिप्स वापरा आणि दिवाळी गोड करा
घरातील सर्वांना आवडतील असे हे शंकरपाळे बनवून तयार होतात. चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत आवडीने खातील अशी या शंकरपाळ्यांची चव आहे. यात मेथी असल्यामुळे शंकरपाळी थोडीशी कडवट लागत असली तरी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीमध्ये आरोग्यकारी अशी मेथी पासून बनलेली टेस्टी शंकरपाळी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या मेथीपासून दिवाळीसाठी कशी बनवावी शंकरपाळी? बनवण्याची पद्धत पाहा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement