Kinkrant Recipe : संक्रांतीला तिळगूळाचे लाडू, तसं किंक्रांतीला काय बनवतात? आहे खास पदार्थ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Kinkranti Recipe Video : संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला भोगीची भाजी, संक्रांतीला तिळगूळाचे लाडू आणि तिळाचा काटेरी हलवा तसा किंक्रांतीलाही खास पदार्थ बनवण्याची परंपरा आहे.
किंक्रांत म्हणजे मकर संक्रांतीचा दुसरा दिवस हा दिवस 'कर उलटवणे' म्हणूनही ओळखला जातो, जिथं स्त्रिया हळदी-कुंकू करतात आणि संक्रांतीचा उत्साह संपल्यानंतर येणाऱ्या या दिवसाचं स्वागत करतात. मकर संक्रांतीच्या दिवसापासून सुरू असलेले तिळ-गुळाचे लाडू, चिक्की आणि इतर गोड पदार्थ या दिवशीही खाल्ले जातात. पण हा दिवस गोड आणि तिखट पदार्थ बनवून सण साजरा केला जातो. या दिवशी आणखी एक खास पदार्थ बनवला जातो.
संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीला भोगीची भाजी, संक्रांतीला तिळगूळाचे लाडू आणि तिळाचा काटेरी हलवा तसं किंक्रांतीला कणकेच्या गोड धिरड्यांची किंवा बेसनाच्या तिखट धिरड्यांची परंपरा आहे. तिळगुळाच्या पदार्थांच्या जोडीला हे धिरडे खाण्याची प्रथा आहे.
2 कप बेसन पीठासाठी एक टिप्सून जिरं, पाव टिस्पून हिंग, 3 मोठ्या पाकळ्या लसूण, 2 हिरवी मिरची. थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
advertisement
हे वाटण एका भांड्यात काढून त्यात थोडं पाणी टाकून त्यात बेसन पीठ, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून चांगलं मिक्स करून घ्या. 10 मिनिटं ठेवा. पिठावर तुम्हाला बुडबुडे आलेले दिसतील म्हणजे पीठ चांगलं मुरलं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाका.
गॅसवर तवा ठेवा. त्यावर तेल पसरवून घ्या, जसं डोशासाठी लावतो. तवा तापला की गॅस कमी करा. बेसनचं पीठ टाका आणि डोसा पसरवतो तसाच पसरवून घ्या. कडेने तेल सोडा. कडा सुटू लागल्या की परतवा. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
advertisement
युट्युब चॅनेलवर हा रेसिपी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा पदार्थ खान्देशात बनवण्याची प्रथा आहे. संक्रांतीला तिळगूळ देत आपण तिळगूळ घ्या गोडगोड बोला असं बोलतो, तसं कंक्रांतीच्या दिवशी मजा म्हणून दिसेल त्याला नावाने हाक मारता आणि दोन धिरडं घ्या आणि गाढवं हाकलून या असं म्हणायचे, असंही या व्हिडीओत सांगितलं आहे.
advertisement
या धिरड्यासोबत किंक्रांतीला तिळाचे लाडू, डाळीचे लाडू, चुरमुऱ्याचे लाडू देण्याची, खाण्याचीही परंपरा आहे.
Location :
Delhi
First Published :
Jan 15, 2026 9:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Kinkrant Recipe : संक्रांतीला तिळगूळाचे लाडू, तसं किंक्रांतीला काय बनवतात? आहे खास पदार्थ










