Paneer Chilli Recipe: थर्टी फस्टला घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली, हॉटेलची टेस्टही विसराल
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Paneer Chilli Recipe Video: 31 डिसेंबरला एकादशी असल्यामुळे नॉनव्हेज खाणे शक्य नाही पण तरीही काहीतरी खास, चटपटीत आणि पार्टीसाठी परफेक्ट हवंय ना? तर मग आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि झटपट पनीर चिली.
31 डिसेंबरला एकादशी असल्यामुळे अनेक लोकांना नॉनव्हेज खाणे शक्य नाहीये, पण तरीही काहीतरी खास, चटपटीत आणि पार्टीसाठी काहीतरी परफेक्ट हवंय का? जर हवं असेल तुम्ही घरबसल्या रेस्टॉरंट स्टाईलची स्टायलिश पनीर चिल्ली आपल्या मुलांना आ पतीला बनवून खायला देऊ शकता. तर मग आज आपण बनवणार आहोत टेस्टी आणि झटपट पनीर चिली. ही रेसिपी बनवायला सोपी, कमी वेळात होणारी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अगदी मस्त आहे. चला तर मग एकादशीला साजेशी पण चवीला जबरदस्त अशी पनीर चिली रेसिपी सुरू करूया!
साहित्य-
- पनीर – 200 ग्रॅम (चौकोनी तुकडे)
- कॉर्नफ्लोअर – 2 टेबलस्पून
- पाणी – गरजेनुसार
- तेल – तळण्यासाठी
ग्रेव्हीसाठी-
- तेल – 2 टेबलस्पून
- लसूण – 1 टेबलस्पून (बारीक चिरलेला)
- हिरवी मिरची – 1–2 (चिरलेली)
- कांदा – 1 मध्यम (चौकोनी कापलेला)
- शिमला मिरची – 1 (चौकोनी कापलेली)
- सोया सॉस – 1 टेबलस्पून
- चिली सॉस – 1 टेबलस्पून
- टोमॅटो केचप – 1 टेबलस्पून
- मीठ – चवीनुसार
- कॉर्नफ्लोअर – 1 टीस्पून
- पाणी – ½ कप
- स्प्रिंग अनियन – सजावटीसाठी
advertisement
1)पनीर तळणे-
- एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लोअर, मीठ घाला आणि मिक्स करून घ्या.
- मग पनीरचे तुकडे गरम तेलात गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या. बाजूला ठेवा.
2)ग्रेव्ही तयार करणे-
- कढईत तेल गरम करून त्यात लसूण व हिरवी मिरची परतून घ्या.
- कांदा आणि शिमला मिरची घालून 1- 2 मिनिटे हाय फ्लेमवर परतावे (कुरकुरीत राहू द्या).
- आता सोया सॉस, चिली सॉस, केचप व मीठ घाला.
- कॉर्नफ्लोअर पाण्यात मिसळून ग्रेव्हीत घाला व ढवळा.
advertisement
3)पनीर मिसळणे-
- तळलेले पनीर ग्रेव्हीत घालून 1–2 मिनिटे हलके ढवळा.
- वरून स्प्रिंग अनियन घालून गॅस बंद करा.
टिप्स-
ड्राय पनीर चिली हवी असल्यास पाणी कमी वापरा.
जास्त रेस्टॉरंट स्टाईल टेस्टसाठी हाय फ्लेमवरच शिजवा.
पनीर सॉफ्ट ठेवण्यासाठी तळण्याआधी कोमट पाण्यात 10 मिनिटे ठेवा.
गरमागरम Paneer Chilli तयार!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 3:04 PM IST
मराठी बातम्या/Food/
Paneer Chilli Recipe: थर्टी फस्टला घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर चिली, हॉटेलची टेस्टही विसराल










