नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय, मराठी दाम्पत्य आज करत आहे लाखोंची उलाढाल
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
नोकरी सोडून स्वतःचा काही व्यवसाय सुरू करावा या करता नाशिकमधील एका मराठी जोडप्याने पिज्झा सेंटर सुरू केले आहे. नोकरीत घरातील गरजा भागत नसल्याने ऐश्वर्या आणि प्रशांत पाटील यांनी त्यांच्या नवीन 'द पिज्झा शॉप' नावाच्या शॉपला सुरवात केली, असल्याचे लोकल 18 सोबत बोलताना यांनी सांगितले.

प्रशांत आणि ऐश्वर्या यांचे लवमॅरेज असून सुरवाती पासून त्यांनी लग्नानंतर स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरवले होते.
परंतु लग्नानंतर आर्थिक अडचणी आणि घर खर्च निघण्यासाठी इतरांच्या हाताखाली नोकरी देखील केली. नोकरी करत असताना स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी आलेल्या पगारातील काही पैसा साठवून आज स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
आता नोकरी सोडून प्रशांत सकाळी नाशिकमधील मखमलाबाद नाका परिसरात चहा विक्री करत असतो आणि सायंकाळी ऐश्वर्यासोबत पिज्झा सेंटर चालवत असतात. कुठल्याही कामात लाज वाटत नाही आणि जे करतो त्यातून काही शिकायला मिळते असे प्रशांत नेहमी सांगत असतो.
advertisement
प्रशांत आणि ऐश्वर्या हे मराठी दाम्पत्य एका छोट्या हातगाडीवर रोज संधायकली मखमलाबाद परिसरात द पिज़्ज़ा शॉप चालवत असतात. तसेच नोकरीत जितका पैसा दोघानाही मिळत नाही होता त्या पेक्षा जास्त पैसे आज ही जोडी त्यांच्या व्यवसायातून मिळवत असल्याने त्यांनी लोकल 18 च्या माध्यमातून सांगितले आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 10, 2025 7:17 PM IST
मराठी बातम्या/Food/
नोकरी सोडली अन् सुरू केला स्वतःचा व्यवसाय, मराठी दाम्पत्य आज करत आहे लाखोंची उलाढाल