Success Story : पत्नीच्या इच्छेमुळे सोडली नोकरी, सुरू केला व्यवसाय, महिन्याला 1 लाख कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
नाशिकच्या ज्ञानेश्वर आदमाने या तरुणाने देखील चांगल्या पगाराची स्वतःची नोकरी सोडून स्वतःचा रबडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्याकडे तब्बल 12 ते 15 प्रकारच्या स्वादिष्ट अशी रबडी मिळते.
नाशिक : अनेकांचे स्वप्न असते आपला स्वतःचा छोटा का होईना काही तरी व्यवसाय असावा. बरेच लोक ते आपल्या जिद्दीने साकारत सुद्धा असतात. याच पद्धतीने नाशिकच्या ज्ञानेश्वर आदमाने या तरुणाने देखील चांगल्या पगाराची स्वतःची नोकरी सोडून स्वतःचा रबडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याच्याकडे तब्बल 12 ते 15 प्रकारच्या स्वादिष्ट अशी रबडी मिळते. इतकेच नाही तर आज नाशिकमध्ये ज्ञानेश्वर याचे श्रीरॅम राबडीवाला या नावाने 3 आऊटलेट देखील आहेत. यामधून महिन्याला तो 1 लाखापर्यंत कमाई करत आहे.
ज्ञानेश्वर याने आयटीआयमध्ये शिक्षण घेऊन याच क्षेत्रात डिप्लोमा केला आणि त्यानंतर एका खासगी कंपनीत काम देखील केले. 4 वर्ष त्या ठिकाणी काम करत असताना स्वतःचा व्यवसाय असावा अशी पत्नीची इच्छा असल्याने ज्ञानेश्वर याने नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्याने श्रीराम राबडीवाला या नावाने रबडी विक्रीच्या व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी देखील झाला.
advertisement
आज ज्ञानेश्वर याच्याकडे तब्बल 12 ते 15 प्रकारांमध्ये रबडीचे फ्लेवर मिळत असतात. तसेच हे सर्व साहित्य ज्ञानेश्वर हा स्वतःहा बनवून घेत असतो. यासाठी लागणारे दूध तसेच साहित्य ही सर्व उच्च प्रतीची असतात. यात वापरले जाणारे दूध हे लॅब टेस्टिंग करून यात वापरले जात असल्याचे ज्ञानेश्वर याने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. या व्यवसायातून ज्ञानेश्वर हा महिन्याला 1 लाखापर्यंत उत्पन्न घेत आहे.
advertisement
कुठे आहे यांचे दुकान?
नाशिकमधील नाशिक रोड बारील बिटको चौफुलीला तसेच त्रिमूर्ती चौक आणि आणि मुख्य शाखा ही नारायण बापू चौक जेल रोड या ठिकाणी श्रीरॅम रबडी या नावाने उपलब्ध आहे.
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
May 08, 2025 7:58 PM IST
मराठी बातम्या/Food/
Success Story : पत्नीच्या इच्छेमुळे सोडली नोकरी, सुरू केला व्यवसाय, महिन्याला 1 लाख कमाई