श्वारमापासून ते दिलवाले शेक, रमजानमध्ये खवय्यांसाठी मोहम्मद अली रोड वर खाद्यपदार्थांची रेलचेल, पाहा Video

Last Updated:

रमजानमध्ये संध्याकाळी मोहम्मद अली रोडवर खाद्यपदार्थांची रेलचेल पाहिला मिळते. मासांहारापासून ते व्हेज फूडपर्यंत तर मिठाईपासून ते वेगवेगळ्या शरबतांपर्यंत सगळ्या प्रकारचे खाद्य तुम्हाला इथे पाहायला मिळतील.

+
श्वारमापासून

श्वारमापासून ते दिलवाले शेक, रमजानमध्ये खवय्यांसाठी मोहम्मद अली रोड वर खाद्यपदार्थांची रेलचेल

मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी 
मुंबई : इस्लामी कॅलेंडरमधील नववा महिना म्हणजेच रमजानचा महिना. रमजान ईद किंवा ‘ईद-उल-फितर’ असं म्हटलं जाणारा हा सण मुस्लीम बांधवांचा धार्मिक सण. रमजानच्या महिन्यात मोहम्मद अली यांना अल्लाहकडून कुराण मिळाले अशी आख्यायिका आहे. याच मोहम्मद अलींच्या नावाने मुंबईत प्रसिद्ध रस्ता आहे, ज्यावर ईदची खरी लगबग बघायला मिळते. त्या रस्त्याचं नाव 'मोहम्मद अली रोड'. रमजानमध्ये संध्याकाळी मोहम्मद अली रोडवर खाद्यपदार्थांची रेलचेल पाहिला मिळते.
advertisement
मिनारा मशिदीजवळ मोहम्मद अली रोड
मुंबईतील मस्जिद बंदर पश्चिम येथे हा रस्ता किंवा ही गल्ली आहे. मिनारा मशिदीपासून ही गल्ली सुरु होते. असा एकही मुंबईकर नसेल की त्याला ही गल्ली माहित नसेल, कारण रमजानच्या दिवसांत ही गल्ली म्हणजे खवय्यांसाठी तर जन्नतच असते. मासांहारापासून ते व्हेज फूडपर्यंत तर मिठाईपासून ते वेगवेगळ्या शरबतांपर्यंत सगळ्या प्रकारचे खाद्य तुम्हाला इथे पाहायला मिळतील. वर्षातून एकदाच रमजानच्या महिन्यात तिथे खाद्यपदार्थांची मोठी रेलचेल असते. विशेषतः मांसाहार करणाऱ्यांसाठी ती खाऊगल्ली म्हणजे एक मोठी मेजवानीच असते.
advertisement
श्वारमा, कबाब, विविध प्रकारचे मांसाहारी पदार्थ, चिकन सूप, इत्यादी पदार्थ तिथे खायला मिळतात. गोड पदार्थांमध्येही फार वेगवेगळे पदार्थ पाहायल मिळतात. यातील एक पदार्थ म्हणजे सांधल. मिठाई भात, नारळ आणि मलई यापासून बनवलेली असते. जिला रमजानच्या महिन्यात विशेष महत्त्व असते. ही मिठाई फक्त 40 रुपयांना मिळते. तर, नल्ली निहारीपासून ते कबाब आणि हैदराबादी हलीमपर्यंत विविध प्रकारच्या डिशेसही तुम्हाला चाखायला मिळतील. नल्ली निहारीची किंमत 500 ते 700 रुपयांच्या घरात असते. तर हलीमची किंमत ही 150 ते 200 रुपयांपर्यंत आहे. तसेच कोकोनट क्रश, दिलवाले शेकही इथे फार फेमस आहे. खवय्ये आवर्जून हे खाण्यासाठी येतात. नारळामध्ये हा शेक आईसक्रिमसहित सर्व्ह केला जातो. याची किंमत 150 ते 180 रुपयांपासून सुरु होते. अर्थात या पदार्थांची किंमत वेगवेगळ्या स्टॉलवर वेगवेगळी पाहायला मिळेल.
advertisement
वर्षभरात रमजानच्या महिन्यात मुंबईतील मोहम्मद अली रोडवर मेजवाणीचा आस्वाद घेता येतो. रात्री सुरू होणारी छोटी मोठी दुकाने पहाटेपर्यंत खुली असतात आणि त्यावर खवय्ये खाण्याचा मनमुराद आनंद लुटतात. रमजानच्या महिन्यात जरा जास्तच गर्दी इथे पाहायला मिळते पण पोलिसांचा बंदोबस्तही तेवढाच तगडा असतो. त्यामुळे कितीही उशीरा या खाऊ गल्लीची सफर तुम्ही निर्धास्त करू शकता. त्यामुळे लज्जतदार पदार्थ चाखण्यासाठी एकदा तरी मोहम्मद अली रोडवर जायलाच हवं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
श्वारमापासून ते दिलवाले शेक, रमजानमध्ये खवय्यांसाठी मोहम्मद अली रोड वर खाद्यपदार्थांची रेलचेल, पाहा Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement