Solapur Food: फक्त 15 रुपयांत मिळतेय पिठलं-भाकरी, 50 वर्षांपासून सोलापूरकरांना स्वस्तात जेवण, पाहा Location
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur Food: सोलापुरात गेल्या 50 वर्षांपासून स्वस्तात पिठलं-भाकरी मिळणारं ठिकाण आहे. इथं आजही 15 रुपयांत जेवण मिळत असून नेहमी गर्दी असते.
सोलापूर: गोरगरिबांसाठी 10 रुपयांत मिळणाऱ्या ‘शिवभोजन थाळी’ बाबत सर्वांना माहिती असेल. परंतु, सोलापुरात गेल्या 50 वर्षांपासून स्वस्तात जेवण मिळणारं एक ठिकाण आहे. भाकरी, चपाती आणि त्यासोबत पिठलं (झुणका), हिरवी मिरचीचा ठेचा अगदी स्वस्तात विकण्यास बिस्मिल्ला पटेल यांच्या सासूबाईंनी सुरुवात केली होती. आता महागाईच्या काळात दर वाढले असून आता भाकरी आणि चपाती 15 रुपयांना मिळतेय. तर पिठलं अन् हिरव्या मिरचीचा ठेचा देखील त्यावर देत असल्याचं पेटल यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
सोलापुरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरासमोर असलेल्या फुटपाथवर गेल्या 50 वर्षांपासून भाकरी, चपाती मिळते. बिस्मिल्ला पटेल यांच्या सासूबाईंनी हा व्यवसाय सुरू केला होता. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत या ठिकाणी चपाती आणि भाकरी मिळते. त्यासोबत खाण्यासाठी पिठलं आणि हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा दिला जातो. फक्त 15 रुपयांत एक भाकरी आणि सोबतच खाण्यासाठी पिठलं आणि ठेचा दिला जातो. हा व्यवसाय बिस्मिल्ला यांनी पुढे सुरू ठेवला आहे.
advertisement
सोलापूर शहराच्या मध्यावर आणि सोयीच्या ठिकाणी स्वस्तात जेवण मिळतं. त्यामुळे बिगारी कामगार, रिक्षा चालक, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, इतर कामगार देखील या ठिकाणाहून भाकरी आणि चपाती घेऊन जातात. बिस्मिल्ला पटेल यांच्या हातची झुणका भाकरी घाण्यासाठी देखील याठिकाणी नेहमीच गर्दी असते.
advertisement
सध्या सोलापुरात मोठ-मोठे हॉटेल झाले आहेत. तरीही इथल्या भाकरीची चव खास आहे. गोरगरिबांपासून ते अगदी श्रीमंत लोक देखील या ठिकाणाहून गरमागरम भाकरी घेऊन जातात. बिस्मिल्ला पटेल यांच्याकडे दोन महिला कामगार देखील आहेत. या व्यवसायातून सर्व खर्च वजा महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांची कमाई होते, असं पटेल सांगतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 10, 2025 3:13 PM IST
मराठी बातम्या/Food/
Solapur Food: फक्त 15 रुपयांत मिळतेय पिठलं-भाकरी, 50 वर्षांपासून सोलापूरकरांना स्वस्तात जेवण, पाहा Location