Solapur Bhakri: सोलापूरची कडक भाकरी बनणार जागतिक ब्रँड, लवकरच ‘जीआय’ मानांकन
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Solapur News: चादर अन् टॉवेलनंतर सोलापूरच्या आणखी एका वस्तूला जीआय मानांकन मिळणार आहे. सोलापुरी कडक भाकरीला आता नवी ओळख मिळणार आहे.
सोलापूर : महाराष्ट्रातील अनेक वस्तूंना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. याची सुरुवात सोलापुरातील चादर आणि टेरी टॉवेलने झाली होती. आता सोलापूरची ज्वारी आणि बाजरीच्या कडक भाकरीला जीआय मानांकन मिवळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आवश्यक प्रक्रिया मार्गी लागल्या आहेत. असे मानांकन मिळाल्यास कडक भाकरी सोलापुरी ब्रँड म्हणून जगभरात भाव खाणार आहे.
सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि बचत गटांच्या माध्यमातून ज्वारी आणि बाजरीच्या कडक भाकरीस जीआय मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट असोसिएशनकडे प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट असोसिएशने सर्वेक्षणाचे काम सुरू केले असून सोलापूरच्या ज्वारी आणि बाजरीच्या कडक भाकरीला लवकरच जीआय मानांकन मिळणार आहे.
advertisement
सोलापुरी कडक भाकरीचे वैशिष्ट्य
सोलापूरची कडक भाकरी ही महाराष्ट्रातील ज्वारी आणि बाजारीपासून बनवली जाते. कडक भाकरी ही शंभर टक्के शाकाहारी पदार्थ असून खाण्यास अतिशय रुचकर आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. तसेच कडक भाकरी लवकर खराब देखील होत नाही. ती दीर्घकाळ टिकते त्यामुळे खाण्यासाठी सोयीची असते.
advertisement
दरम्यान, जागतिक व्यापार कायद्यानुसार 'जीआय' मानांकन प्राप्त उत्पादने जगभरात आपला ठसा उमटवितात. तसेच जीआय मानांकन मिळाल्यास त्या शहराला व उत्पादनाला जागतिक पातळीवर ओळख मिळते. आता चादर, टेरी टॉवेल नतर सोलापुरी कडक भाकरीला जीआय मानांकन मिळणार असल्याने सोलापूरची नवी ओळख जागतिक पातळीवर होणार आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
August 12, 2025 11:12 AM IST









