Art Cafe : पहाडी मॅगी आणि आर्टची मजा, फक्त 50 रुपयांत, मुंबईतील 2 मित्रांचा अनोखा कॅफे, Video
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
फक्त 50 रुपयांत गरमागरम पहाडी मॅगी आणि त्यासोबत स्वतःच्या आवडीचं आर्ट करण्याची मजा आर्ट कॅफे हीच संकल्पना घेऊन दोन तरुण मित्रांनी सुरू केला आहे.
मुंबई: फक्त 50 रुपयांत गरमागरम पहाडी मॅगी आणि त्यासोबत स्वतःच्या आवडीचं आर्ट करण्याची मजा विरार पश्चिममधील आर्ट कॅफे हीच संकल्पना घेऊन दोन तरुण मित्रांनी सुरू केला आहे. अनिकेत पाटील आणि प्रथमेश सातार्डेकर या जोडीने हा कॅफे उभारला आहे. जिथे ग्राहकांना चव आणि कला दोन्हीचा अनुभव मिळतो.
अनिकेत हा व्यवसायाने फार्मासिस्ट आहे, तर प्रथमेश हा ॲप डेव्हलपर. दोघेही लहानपणापासून एकत्र शाळेत शिकले, मात्र नंतर त्यांनी करिअरची वेगवेगळी क्षेत्रं निवडली. तरीही काहीतरी एकत्र करायचं या इच्छेतून त्यांनी दीड वर्षांच्या तयारीनंतर हा भन्नाट आर्ट कॅफे सुरू केला.
advertisement
येथील फूड चविष्ट आणि परवडणारे आहे. फक्त 50 रुपयांपासून सुरू होणाऱ्या मॅगीच्या व्हरायटीजमध्ये पहाडी मॅगी, चिझ मॅगी, आणि स्पायसी पर्क मॅगी मिळतात. याशिवाय बर्गर, पास्ता, फ्रेंच फ्राईज, आणि सँडविचेस हेही लोकप्रिय पर्याय आहेत. डेझर्टमध्ये चिझ केक, ब्राऊनी विथ आइसक्रीम आणि चॉकलेट मूसचा समावेश आहे.
इथे कोल्ड्रिंक्समध्ये व्हर्जिन मोजिटो, ब्लू लगून, स्ट्रॉबेरी मॉकटेल, कोल्ड कॉफी, हॉट चॉकलेट, आणि हॅझलनट कॅपुचिनोसारखे पर्याय येथे उपलब्ध आहेत. या कॅफेचं वेगळेपण म्हणजे, ग्राहकांना ऑर्डर येईपर्यंत आपल्या आवडीचं आर्ट करता येतं. टोट बॅग पेंटिंग, कॅनव्हास आर्ट, किंवा विणकाम जसं मनात येईल तसं. रंग, ब्रश, आणि साहित्य कॅफेमध्येच मोफत उपलब्ध करून दिलं जातं.
advertisement
अनिकेत आणि प्रथमेश सांगतात, आम्हाला असं ठिकाण तयार करायचं होतं जिथे लोकांना फक्त खायला नाही, तर स्वतःसाठी थोडा वेळ मिळेल. खाणं आणि कला दोन्ही मनाला रिलॅक्स करतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 01, 2025 3:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Art Cafe : पहाडी मॅगी आणि आर्टची मजा, फक्त 50 रुपयांत, मुंबईतील 2 मित्रांचा अनोखा कॅफे, Video








