शाकाहाऱ्यांचं मटण, फक्त 15 दिवस मिळते भाजी, खाऊन जीव होतो तृप्त!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
चवीच्या बाबतीत चिकन, मटणाला तोड देते म्हणून ही भाजी खूप महाग मिळते. तरीही लोक आवडीनं खरेदी करतात.
मोहित शर्मा, प्रतिनिधी
करौली : पावसाळ्यात बाजारात हंगामी फळं आणि भाज्या मिळतात. त्यात एक भाजी केवळ 15 दिवसच उपलब्ध असते, पण चवीला मात्र अगदी मटणासारखी लागते. या भाजीची शेती करत नाहीत, तर ती जंगलात आपोआप उगवते.
केवळ 15 दिवस मिळते, चवीच्या बाबतीत चिकन, मटणाला तोड देते म्हणून ही भाजी खूप महाग मिळते. तरीही लोक आवडीनं खरेदी करतात. कटुरले किंवा करटोली अशा विविध नावांनी या रानभाजीला ओळखलं जातं. दिसायला ती कारल्याच्या कुटुंबातलीच दिसते. तिलाही काटे असतात.
advertisement
विशेष म्हणजे या भाजीला उगवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं खत किंवा औषध फवारणीची गरज नसते. पूर्णपणे नैसर्गिकरित्या उगवत असल्यानं ती आरोग्यासाठी गुणकारी ठरते. अनेकजण वर्षभर या भाजीची आतुरतेनं वाट पाहतात. खरंतर श्रावणात मांसाहार केला जात नसल्यानं ही भाजी खाल्ल्यावर मांसाहारप्रेमींचा जीव अगदी तृप्त होतो. मागणी मोठी असल्यानं या भाजीही किंमतही तशीच असते. 60 रुपयांपेक्षा कमी भावानं ती मिळतच नाही. कधीकधी तर 1 किलोसाठी अडीचशे रुपये मोजावे लागतात.
advertisement
आयुर्वेदिक डॉक्टर ओम प्रकाश भारद्वाज सांगतात की, कटुरले भाजी कारल्याशी मिळतीजुळती आहे. यात भरपूर आयर्न आणि प्रोटीन असतं. या भाजीतून शरिराला मांसाहाराएवढे पोषक तत्त्व मिळतात. यामुळे जुलाब, कावीळ, इत्यादी आजारांवर आराम मिळू शकतो. शिवाय ब्लड शुगर कंट्रोल राहण्यासही मदत मिळते. तसंच अशक्तपणा दूर होतो.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Karauli,Rajasthan
First Published :
August 10, 2024 6:52 PM IST