पत्नी खंबीरमध्ये सोबत राहिली अन् पतीने पूर्ण केलं आपलं स्वप्न, दिव्यातील दाम्पत्याची प्रेरणादायी कहाणी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
सिद्धार्थने कॉमर्स शाखेत अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेतले. नंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. कोर्स पूर्ण झाल्यानंतर लगेचच सिद्धार्थने नोकरी शोधण्यास सुरुवात केली.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : व्यवसाय करणे हे अनेकांचे स्वप्न असते. पण सगळ्यांनाच हे जमते असे नाही. मात्र, नोकरी करता करता व्यवसाय कसा करता येतो, हे दिव्यातील एका तरुणाने सिद्ध करुन दाखवले आहे. सिद्धार्थ यादव असे या तरुणाचे नाव आहे. सिद्धार्थने कॉमर्स शाखेत अकरावी आणि बारावीचे शिक्षण घेतले. नंतर त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. कोर्स पूर्ण झाल्यानंतर लगेचच सिद्धार्थने नोकरी शोधण्यास सुरुवात केली. 7 वर्षे जॉब केल्यानंतर त्याने पाहिलेलं व्यवसायाचं स्वप्न सत्यात उतरवले आहे.
advertisement
कॉलेजच्या दिवसांपासूनच स्वतःचा व्यवसाय असावा, स्वतःचा कॅफे किंवा हॉटेल असावं, असं त्याला वाटत होतं. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते त्याला शक्य नव्हतं. पण 7 वर्ष जॉब केल्यानंतर आता त्याने दिव्यामध्ये स्वतःचा कॅफे सुरू केला आहे. दिवा स्टेशनपासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर त्याचा हा कॅफे आहे.
advertisement
द अर्बन इटरी कॅफे असे या कॅफेचे नाव आहे. इथे पिझ्झा, कुल्हड पिझ्झा, बर्गर, मोमोज असे सगळे पदार्थ मिळतात. सिद्धार्थ सकाळी सेल्स मॅनेजर म्हणून एका कंपनीत काम करतो. त्यानंतर संध्याकाळी तो आणि त्याची पत्नी मिळून हे कॅफे चालवतात.
नोकरी आणि व्यवसाय दोन्ही एकत्र सांभाळणं, हे अतिशय कठीण काम आहे. मात्र, निश्चय आणि जिद्ध असेल तर व्यक्ती आपलं स्वप्न पूर्ण शकतो, हे सिद्धार्थने सिद्ध करुन दाखवले आहे. त्याच्या संपूर्ण प्रवासात त्याच्या पत्नीची त्याला साथ लागली आहे.
advertisement
काय म्हणाला सिद्धार्थ -
advertisement
'मला कॉलेज मध्ये असल्यापासूनच स्वतःचा कॅफे खोलण्याची इच्छा होती. माझ्या पत्नीची मला या संपूर्ण प्रवासात खूप मदत मिळाली आहे. दिव्यातील लोकांना स्वस्त दरात मोमोज, बर्गर या गोष्टी खाता यावे, म्हणूनच मी दिव्यात माझा कॅफे सुरू केला,' असे सिद्धार्थने सांगितले. सिद्धार्थच्या कॅफेममध्ये मिळणारे बर्गर, मोमोज आणि पोटॅटो ट्विस्टर दिव्यातील खवय्यांना फार आवडू लागले आहेत. त्यामुळे इथे चांगली गर्दीही पाहायला मिळते.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
July 12, 2024 1:11 PM IST
मराठी बातम्या/Food/
पत्नी खंबीरमध्ये सोबत राहिली अन् पतीने पूर्ण केलं आपलं स्वप्न, दिव्यातील दाम्पत्याची प्रेरणादायी कहाणी