Soya Chaap : व्हेजप्रेमींसाठी नाशिकमध्ये खास सोयाचाप, एकाच ठिकाणी मिळतायंत 16 प्रकार, चव अशी की खातच राहाल, Video

Last Updated:

चिकन आणि मटनाची चव ही शुद्ध शाकाहारी खाण्यात मिळत असेल तर फक्त सोयाचापमध्येच मिळते. सोयाचापची चव व्हेज प्रेमींसाठी नाशिकमध्ये दिपक बाविस्कर यांनी सर्वात प्रथम आणली.

+
नॉनव्हेज

नॉनव्हेज प्रमाणेच असते सोयाचापची चव.

नाशिक : चिकन आणि मटनाची चव ही शुद्ध शाकाहारी खाण्यात मिळत असेल तर फक्त सोयाचापमध्येच मिळते. नॉनव्हेज सारखे दिसणारे आणि चवीलाही त्याच पद्धतीने लागणारे या सोयाचापची सुरुवात भारतातील पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये झाली. परंतु ही चव तिथेच नाही राहिली तर या सोयाचापची चव व्हेज प्रेमींसाठी नाशिकमध्ये दिपक बाविस्कर यांनी सर्वात प्रथम आणली. नेमके सोयाचाप हा काय पदार्थ आहे? नाशिकमध्ये त्यांनी याची सुरुवात कशी केली? याबद्दलचं दिपक बाविस्कर यांनी माहिती दिली आहे.
कसा सुरू केला नाशिकमध्ये सोयाचाप?
दिपक यांना आधीपासून खाण्याच्या पदार्थांची आवड आहे. त्यातच त्यांनी त्यांच्या बहिणीकडे हरियाणामध्ये या सोयाचाप पदार्थांची चव घेतली. व्हेजमध्ये नॉनव्हेजची चव आणि तितकेच प्रोटीन देखील यात असल्याचे त्यांना समजल्यानंतर आपण नाशिकमध्ये याची सुरुवात केली तर व्हेज प्रेमींसाठी पनीर आणि मशरूम सोबत अजून एक पदार्थ चाखायला मिळेल या हेतूने 2016 मध्ये सर्वात प्रथम सोयाबाईट या नावाने सोयाचाप हा पदार्थ सुरू केला.
advertisement
काय आहे सोयाचाप बार्बिक्यू?
नॉनव्हेज सोडून व्हेज किंवा व्हेगन झालेले लोक बऱ्याचदा व्हेजमध्ये नॉनव्हेजचा स्वाद आणि फील शोधताना दिसतात. तसेच घरात नॉन व्हेज चालत नाही पण त्याची चव चाखाविशी वाटणारे अनेक तरुण तरुणी सोयाचाप हा पदार्थ आवडीने खात असतात.
advertisement
पंजाब आणि हरियाणा राज्यात या सोयाचापची सुरुवात झाली. चिकन प्रमाणे एका लोखंडी आसरित या सोयाचापचे तुकडे भट्टीत तंदूर करून दिले जात असतात. सोयाबीन तेल काढल्यानंतर जो पदार्थ उरतो त्यात मक्याचे पीठ, काहीसे मसाले, कुरकुरीत लागण्यासाठी कॉन्फ्लॉवर टाकून हे बनवले जात असते.
दिपक हे सोयाचाप स्वतः बनवून घेत असतात. त्यामुळे यांच्या सोयाचापमध्ये कुठलेही हानिकारक पदार्थ वापरले जात नाही. यांच्या चापमध्ये 24 टक्के प्रोटीन कंटेन्ट देखील आहे. तसेच यात फायबर कंटेन्ट देखील 9.6 टक्के आहे आणि याची फूड लॅब टेस्टिंग देखील त्यांनी केली असल्याचे ते सांगतात.
advertisement
सोयाचाप बार्बिक्यूमध्ये आहेत 16 वेगवेगळे फ्लेवर्स
सोया चाप हे मुख्यत्वे स्टार्टर म्हणून लोक खातात. सोयाचाप, पनीर आणि मशरूम्समध्ये मसाला, पुदिना, गार्लिक, लेमन, आचारी, पेरीपेरी, व्हाईट क्रीम, स्पायसी, अफगाणी, नॉन स्पायसी असे अनेक फ्लेवर्स दिपक यांनी विकसित केले. त्यांचा इराणी फ्लेवर खूप लोकप्रिय आहे. मेन कोर्समध्ये बटर चिकन, पंजाबी कुक्कड अशा सगळ्या व्हेज ग्रेव्ही करून त्यात सोया, पनीर आणि मशरूम्स टाकून डिशेस ते बनवतात. साधारण 150 ते 200 रुपयात यांच्याकडे हे सोयाचाप तुम्हाला चाखायला मिळत असतात. सर्वात जास्त चालणारा हा सोयाचाप चा पदार्थ जास्त करून दिल्ली, हरियाणा, अमृतसरमध्येच आहे. परंतु हा पदार्थ दिपक यांनी नाशिकमध्ये आणल्यानंतर त्याला इतकी लोकप्रियता आली की आज नाशिकमध्ये दिपक यांचे 3 दुकाने आहेत.
advertisement
तसेच दिपक हे तरुण पिढीला कमी खर्चात रोजगार देण्यासाठी देखील मदत या व्यवसायातून करत आहेत. ते अगदी कमी पैशात तरुणांना त्यांची ही सोयाचापची फ्रेंचायसी देखील देत असतात. ज्यातून या व्यवसायातून कोणीही 60 ते 70 हजार रुपये महिना कमवू शकतो, असे दिपक सांगतात.
तुम्हाला यांची सोयाचाप चाखायची असल्यास नाशिकमधील कॉलेज रोड परिसरातील बिगबाजाराच्या बाजूला तसेच गोविंद नगर परिसरात आणि इंदिरानगर परिसरात चर्चच्या समोरच तुम्हाला सोयाबाईटस या नावाने मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Soya Chaap : व्हेजप्रेमींसाठी नाशिकमध्ये खास सोयाचाप, एकाच ठिकाणी मिळतायंत 16 प्रकार, चव अशी की खातच राहाल, Video
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement