Mumbai Food : भट्टी शोरमा आणि मोमोज, फक्त 70 रुपयांपासून घ्या आस्वाद, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
सध्या मोमोज, शोरमा आणि चायनीज पदार्थांची लोकप्रियता वाढत चालली आहे. सहज कुठेही हे पदार्थ मिळतात आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन बोरिवलीतील चार मित्रांनी स्वतःचा पार्ट टाइम व्यवसाय सुरू केला आहे.
मुंबई : सध्या मोमोज, शोरमा आणि चायनीज पदार्थांची लोकप्रियता वाढत चालली आहे. सहज कुठेही हे पदार्थ मिळतात आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन बोरिवलीतील चार मित्रांनी स्वतःचा पार्ट टाइम व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी Bite Buzz नावाचा फूड ट्रक सुरू केला असून, या ट्रकमध्ये फक्त 70 रुपयांपासून मोमोज, शोरमापासून विविध पदार्थ उपलब्ध आहेत. लहानपणापासून एकत्र असलेल्या या चौघांनी आपल्या प्रोफेशन सोबत पार्ट टाइम व्यवसाय करायला 2 महिन्यांपूर्वी सुरुवात केलीच पण यात त्यांनी सर्वांपेक्षा वेगळेपणा द्यायचं ठरवलं.
मोमोज, फ्राईज, नूडल्स यांसह इथे मिळणारा भट्टी शोरमा हा विशेष आकर्षण ठरत आहे. या प्रकारचा शोरमा मुंबईत फार ठिकाणी फूड ट्रक मध्ये मिळत नसतो. तर त्यांनी ट्रक मध्ये भट्टी शोरमा बनवायचं धाडस केलं.
हे चारही मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. सुशांत मोहिते आणि सुशांत बोरिवले ही दोघं फोटोग्राफर आहेत. अभिषेक मुळे हा जिम ट्रेनर आणि साहिल हा बँकेत नोकरी करणारा आहे. लहानपणापासून एकत्र काहीतरी करण्याचं त्यांचं स्वप्न होतं, आणि आता त्यांनी Bite Buzz च्या माध्यमातून ते प्रत्यक्षात आणलं आहे.
advertisement
इथले मुख्य पदार्थ आणि किंमती:
भट्टी शोरमा – 70 रुपये
स्टीम / फ्राईड मोमोज – 70 रुपये
पनीर फ्राईड राईस – 100 रुपये
शेजवान नूडल्स – 120 रुपये
चीज फ्राईज / पेरिपेरी फ्राईज – 80 ते 100 रुपये
या फूड ट्रकची वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता आणि हायजिन. अनेकदा म्हटलं जातं की बाहेरील गाड्यावरील पदार्थ म्हणजे शून्य हायजिन पण हीच गोष्ट मोडीत काढून या चौघांनी फूड ट्रक मध्ये विशेष स्वच्छता राखली आहे. इथल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातात ग्लोज आणि डोक्यावर टोपी वापरणं आवश्यक केले आहे. तसेच व्हेज आणि नॉन-व्हेज पदार्थांसाठी स्वतंत्र विभाग ठेवण्यात आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 11:44 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Mumbai Food : भट्टी शोरमा आणि मोमोज, फक्त 70 रुपयांपासून घ्या आस्वाद, मुंबईतील हे ठिकाण माहितीये का?

