चिकन चीज बर्गर अन् मोमोज, फक्त 50 रुपयांपासून घ्या घरगुती आस्वाद, मुंबई हे आहे लोकेशन
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या ठिकाणी मोमोज, बर्गर, मिल्कशेक, फ्रायज यांसोबतच फिश आणि चिकन प्लेटर्सही अतिशय परवडणाऱ्या दरात मिळतात.
मुंबई : मुंबईत कमी किमतीत पण उत्तम क्वालिटीचे स्ट्रीट फूड मिळणाऱ्या जागांपैकी प्रभादेवीतील मस्त खाऊ – तृप्त राहू हा फूडकार्ट सध्या फूडींमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहे. प्रभादेवी स्टेशनपासून अवघ्या पाच मिनिटांवर महाराष्ट्र उद्योग भवनच्या अपोजिट आणि रिलायन्स डिजिटल मॉलच्या अगदी खाली हा फूडकार्ट आहे. या ठिकाणी मोमोज, बर्गर, मिल्कशेक, फ्रायज यांसोबतच फिश आणि चिकन प्लेटर्सही अतिशय परवडणाऱ्या दरात मिळतात. आकर्षक बाब म्हणजे सर्व पदार्थांची किंमत फक्त 50 रुपयांपासून सुरू होते.
नवरा बायकोची पार्ट-टाइम फूड जर्नी
advertisement
अक्षय आणि अपूर्वा या दोघांनी मिळून हा फूडकार्ट सुरू केला आहे. दिवसभर दोघेही कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करतात आणि नोकरीनंतर उत्साहाने हा फूडकार्ट चालवतात. इथे मिळणारे पदार्थ ते दोघेही घरी बनवतात. कोणताही पदार्थ शिळा नसून सर्व काही फ्रेश असत. मोमोज घरचे, चिकन आणि मासे रोज ताजे आणलेले, त्यामुळे चव आणि क्वालिटी दोन्हीही उत्तम.
advertisement
काय मिळतं इथे?
advertisement
बर्गर्स (60 रुपयांपासून)
advertisement
व्हेज बर्ग , व्हेज चीज बर्गर , चिकन बर्गर , चिकन चीज बर्गर
advertisement
मोमोज (50 रुपयांपासून)
advertisement
क्लासिक मोमोज , चीज मोमोज , पनीर मोमोज , शेजवान मोमोज
फ्रायज – (60 रुपयांपासून)
क्रंची बाईट्स , व्हेज नगेट्स , पिझ्झा फिंगर्स
मस्त खाऊ स्पेशल व्हेज प्लेटर
क्रॅब लॉलीपॉप , चिकन नगेट्स , चिकन पॉपकॉर्न
ड्रिंक्स
मिल्कशेक (ओरिओ व चॉकलेट) – फक्त 40 रुपयांपासून
कॅफे कोल्ड कॉफी – 15 रुपयांपासून
कमी किंमत, जास्त चव
कमी पैशांत भरपूर पर्याय, ताजी क्वालिटी आणि होममेड फ्लेवर ही या फूडकार्टची खासियत आहे. प्रभादेवी परिसरात स्वस्त, चविष्ट आणि फ्रेश स्नॅक्स शोधत असाल तर मस्त खाऊ –तृप्त राहू हा नक्कीच एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 4:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
चिकन चीज बर्गर अन् मोमोज, फक्त 50 रुपयांपासून घ्या घरगुती आस्वाद, मुंबई हे आहे लोकेशन








