सूरत स्पेशल आईस्क्रीम फालुद्याचा आता मुंबईत घ्या आस्वाद; 80 रुपयांत मिळतायत फुल्ली लोडेड 4 स्कूप
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आपल्यापैकी अनेक जणांना जेवण केल्यानंतर काही तरी गोड खाण्याची सवय असते. मुंबईत सूरत स्पेशल आईस्क्रीम फालुदा खायला मिळत आहे.
लतिका तेजाळे, प्रतिनिधी
मुंबई : आपल्यापैकी अनेक जणांना जेवण केल्यानंतर काही तरी गोड खाण्याची सवय असते. त्यात जेवणानंतर गोडात फुल्ली लोडेड 4 स्कूपचा आईस्क्रीम फालुदा एकदम परवडणाऱ्या किंमतीत खायला मिळाला तर? दिवसाचा शेवट नक्कीच गोड होईल. ज्या ठिकाणी परवडणाऱ्या किंमतीत काही मिळत असेल तर त्या ठिकाणी सर्रास गर्दी झालेली पाहायला मिळते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुंबईतील अश्याच ठिकाणाबद्दल माहिती देणार आहोत जिथे फक्त 80 ते 100 रुपयांत फुल्ली लोडेड 4 स्कूपचा असा आईस्क्रीम फालुद्याचा आस्वाद घेऊ शकता.
advertisement
कुठे आहे ठिकाण?
मुलुंडच्या एमजी रोड परिसरात असलेल्या हनुमंते आईस्क्रीम या दुकानात चक्क सूरत स्पेशल फालुदा मिळत आहे. या दुकानाचे व्यवस्थापक शंकर सिंघ चौरसिया हे आहेत. या ठिकाणी सूरत स्पेशल केसर आणि रोज फालुद्याचा आस्वाद खवय्ये 80 ते 100 रुपयांत घेऊ शकतात. 4 स्कूपचा आईस्क्रीम फालुदा या ठिकाणी मिळतो.
advertisement
सूरत स्पेशल फालुदाचे वैशिष्ट्य?
हनुमंते आईस्क्रीम हे सूरतचे एक आईस्क्रीम ब्रांड आहे. सूरतमध्ये केशर आणि रोज फालुदा प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे मुंबईत देखील हा फालुदा खाण्यासाठी खवय्ये आवर्जून गर्दी करतात. विशेष म्हणजे प्रीमियम क्वालिटीची आईस्क्रीम या ठिकाणी अतिशय पॉकेट फ्रेंडली किंमतीत मिळते. त्या सोबतच या ठिकाणी केसर फालुदा हा 80 ते 100 रुपयांत मिळतो. ज्यात एका ग्लासमध्ये केसरचा फ्लेवर घेऊन त्यात शेवई किंवा सब्जा घातले जाते. त्या ग्लासमध्ये फालुदाचे मिल्कशेक टाकले जाते. आणि महत्त्वाचे म्हणजे शेवटी आईस्क्रीमचे 4 वेग वेगळे फ्लेवरचे स्कूप म्हणजेच मिक्स आईस्क्रीम, मेवाड स्पेशल मलाई आईस्क्रीम, केसर पिस्ता आईस्क्रीम आणि ब्लॅक करंट आइस्क्रीम त्यावर सर्व्ह केले जातात.
advertisement
हा सूरत स्पेशल आईस्क्रीम फालुदा खाण्यासाठी खवय्ये रात्रीच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. हा 80 ते 100 रुपयांत मिळणारा फालुदा 2 व्यक्ती आरामात मिळून खाऊ शकतात, अशी माहिती या दुकानाचे व्यवस्थापक शंकर सिंह चौरसीया यांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 14, 2024 12:39 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
सूरत स्पेशल आईस्क्रीम फालुद्याचा आता मुंबईत घ्या आस्वाद; 80 रुपयांत मिळतायत फुल्ली लोडेड 4 स्कूप