मैदा नाही तर गव्हाच्या कणकेपासून 10 मिनिटात बनवा खस्ता नमकीन; एकदा नक्की ट्राय करून पाहा ही रेसिपी Video

Last Updated:

अगदी घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही चविष्ट रेसिपी बनते. तुम्ही प्रवासात जाणार असाल तेव्हाही कणकेपासून बनलेला खस्ता नमकीन सोबत नेऊ शकता.

+
News18

News18

अमिता शिंदे, प्रतिनिधी
चंद्रपूर : खस्ता नमकीन खायला सर्वांना आवडतं. मात्र सहसा खस्ता मैदा पासून बनविला जातो. त्यामुळे अनेकजण खाणं टाळतात मात्र तुम्ही गव्हाच्या कणकेपासून खस्ता नमकीन बनवू शकता. अगदी घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही चविष्ट रेसिपी बनते. तुम्ही प्रवासात जाणार असाल तेव्हाही कणकेपासून बनलेला खस्ता नमकीन सोबत नेऊ शकता. ही रेसिपी गव्हाच्या कणकेपासून अगदी 10 मिनिटांत कशी बनवायची याबद्दच चंद्रपूरमधील गृहिणी कांचन बावणे यांनी दिली आहे.
advertisement
खस्ता नमकीन बनवण्यासाठी साहित्य 
1 वाटी गव्हाची कणिक, अर्धा वाटी रवा, तिखट, हळद, मीठ, धने पावडर, ओवा, कस्तुरी मेथी, तेल, पाणी आणि आमचूर पावडर, सोप देखील अ‍ॅड करू शकता.
खस्ता नमकी बनविण्यासाठी कृती
सर्वप्रथम एका परातीत कणिक घेऊन त्यात रवा अ‍ॅड करावा. त्यानंतर त्यात सर्व मसाले म्हणजे तिखट, मीठ, हळद, हातावर बारीक करून कस्तुरी मेथी आणि ओवा टाकावा. त्यात तुम्ही आमचूर पावडर आणि बारीक करून सोप घालू शकता. आणि त्यानंतर तेल अ‍ॅड करायचं आहे. तेल गरम किंवा थंड असलं तरी चालेल. आता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे.
advertisement
Video: उपवासाला खावा भगरीचे लाडू, विदर्भातील रेसिपी माहितीये का?
आता थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा भिजवून घ्या. आता त्याची मोठी पात्तळ पोळी लाटून घ्या. आणि पोळीवर फोर्क किंवा चाकूने टोचून घ्या म्हणजे पापडी तेलात फुगणार आणि कुरकुरीत होईल. आता एखादी वाटी किंवा ग्लास घेऊन गोल आकार पाडून घ्या. हे सर्व खस्ता आता तेलात तळून घ्या. तळताना तेल जास्त गरम नसावे. तर मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. जेणेकरून सर्व खस्ता मस्त खुसखुशीत लागेल. आता गव्हाच्या कणकेपासून बनलेला खस्ता नमकीन खाण्यासाठी तयार आहे, असं गृहिणी कांचन बावणे सांगतात.
advertisement
Kadhi Gole Recipe : 1 वाटी चण्याची डाळ, 2 चमचे बेसन, 10 मिनिटांत तयार होतील चविष्ट विदर्भ स्टाईल कढी गोळे, रेसिपी पाहा
तर अगदी 10 मिनिटांत ही चविष्ट रेसिपी बनवून तयार होते. कोणीही सहज बनवू शकेल इतकी सोप्पी अशी रेसिपी आहे. त्यामुळे अतिशय कुरकुरीत, खुसखुशीत, कणकेचा नमकीन खस्ता तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
मैदा नाही तर गव्हाच्या कणकेपासून 10 मिनिटात बनवा खस्ता नमकीन; एकदा नक्की ट्राय करून पाहा ही रेसिपी Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement