दररोज मुलांना टिफिनमध्ये काय नवीन द्यावं? झटपट तयार होणारी 'ही' रेसिपी पाहा

Last Updated:

शाळेत दररोज मुलांच्या टिफिनबॉक्समध्ये काय द्यावं? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर ही रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता.

+
News18

News18

अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : बटाट्याचे पदार्थ अनेकांना आवडीने खायला आवडतात. मात्र, बटाट्याचे पॉपकॉर्न कधी बघितलेत का? तर विशेषतः लहान मुलांना खूप आवडणारी ही रेसिपी आहे. शाळेत दररोज मुलांच्या टिफिनबॉक्समध्ये काय द्यावं? असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर ही रेसिपी तुम्ही बनवून देऊ शकता. अगदी झटपट 10 मिनिटात तयार होणारी बटाट्याचे पॉपकॉर्न रेसिपी वर्ध्यातील गृहिणी शितल लुंगे यांनी सांगितली आहे.
advertisement
बटाट्याचे पॉपकॉर्न बनवण्यासाठी साहित्य 
4-5 कच्चे बटाटे, 1 वाटी कॉर्नफ्लोअर, मिरेपूड, रेडचिली फ्लेक्स, मीठ, कोथिंबीर हे साहित्य लागेल.
बटाट्याचे पॉपकॉर्न बनवण्यासाठी कृती 
सर्वप्रथम कच्चे बटाट्याचे साल काढून घेऊन खिसून घ्यावे. त्यानंतर खिस 4 वेळा स्वच्छ पाणी येतपर्यंत धुवून घ्यावे आणि खिस पिळून एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. त्यानंतर त्या किसलेल्या बटाट्याला मीठ लावून 5 मिनिटं ठेवावे. आता 5 मिनिटं झाल्यानंतर बटाट्याला पाणी सुटेल ते पाणीही पिळून घेऊन त्यावर गोळा तयार होईल इतकंच कॉर्नफ्लोअर पावडर घेऊन रेड चिलीफ्लेक्स ,मिरेपूड, आणि कोथिंबीर अ‍ॅड करून घ्यावी.
advertisement
1 वाटी चण्याची डाळ, 2 चमचे बेसन, 10 मिनिटांत तयार होतील चविष्ट विदर्भ स्टाईल कढी गोळे, रेसिपी पाहा
आधी मीठ टाकलेलं असल्यामुळे आता परत मीठ टाकण्याची गरज नाही. साहित्य छान एकत्र झाल्यानंतर त्याचे छोटे गोळे करून घ्यावे. हे गोळे गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे. आता तुम्हाला आवडेल त्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर हे पॉपकॉर्न लहान मुलांना खायला देऊ शकता, असं शितल लुंगे सांगतात.
advertisement
1 ग्लास तांदूळ आणि 1 वाटी चण्याची डाळ; घरीच तयार करा विदर्भ स्टाईल ‘ही’ प्रसिद्ध रेसिपी
तर अशाप्रकारे अगदी कमी साहित्यात कमी वेळेत झटपट तयार होणारी त्यासोबतच मुलांना खूप आवडणारी ही रेसिपी तुम्ही देखील एकदा नक्कीच ट्राय करून बघा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
दररोज मुलांना टिफिनमध्ये काय नवीन द्यावं? झटपट तयार होणारी 'ही' रेसिपी पाहा
Next Article
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement