Mumbai Food : कुरकुरीतपणाचा सुंदर संगम, खिचिया पापड मुंबईत खावा तर इथंच, 40 रुपयांत मन होईल तृप्त, Video
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
फक्त 40 रुपयांत मिळणारा हा पापड चव आणि कुरकुरीतपणाचा सुंदर संगम आहे.
मुंबई: भुलेश्वर हे मार्केट केवळ खरेदीसाठीच नव्हे तर खाद्यप्रेमींसाठीही एक अप्रतिम ठिकाण म्हणून ओळखले जाते. इथल्या गल्लीबोळात शॉपिंगसह चविष्ट खाऊ मिळतो आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल रमेश मिश्रा फास्ट फूड सेंटरचा. मागील 20 वर्षांपासून हे छोटेसे फूड सेंटर भुलेश्वर गेट क्रमांक 1 च्या शेजारी आपल्या अनोख्या चवीने ग्राहकांची मनं जिंकत आहे.
इथलं सर्वात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे खिचिया पापड. हा पापड मक्यापासून आणि तांदळापासून बनवला जातो. फक्त 40 रुपयांत मिळणारा हा पापड चव आणि कुरकुरीतपणाचा सुंदर संगम आहे. गरमागरम खिचिया पापडावर बारीक चिरलेली काकडी, कोबी, टोमॅटो आणि कैरी घालून त्यावर गोड आणि तिखट चटण्या ओतल्या जातात. शेवटी वरून टाकलेली बारीक शेव या पापडाला आकर्षक आणि स्वादिष्ट बनवते.
advertisement
खिचिया पापडचा रंग, सुगंध आणि तिखट-गोड मिश्र चव खवय्यांच्या जिभेवर चटकन बसते. अनेक वर्षांपासून या ठिकाणी येणारे ग्राहक सांगतात की, भुलेश्वरला गेलो आणि रमेश मिश्रा यांचा खिचिया पापड खाल्ला नाही, तर ट्रिप अपुरीच राहते. काहीजण तर खास या पापडसाठी दूरवरून येतात.
advertisement
दुपारी आणि संध्याकाळी या स्टॉलसमोर नेहमीच गर्दी असते. ऑफिसहून परतणारे, शॉपिंगसाठी आलेले किंवा फक्त काहीतरी हलकं पण चविष्ट खाण्याच्या मूडमध्ये असलेले लोक सगळ्यांसाठी रमेश मिश्रा फास्ट फूड सेंटर एक आवडतं ठिकाण बनलं आहे.
भुलेश्वर म्हटलं की शॉपिंगची आठवण येतेच, पण आता खाद्यप्रेमींना इथल्या खिचिया पापडाची चव ही भुलेश्वरची खास ओळख बनली आहे. मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर चवीचा हा अनुभव नक्कीच प्रत्येकाने एकदा घ्यावा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 25, 2025 3:53 PM IST
मराठी बातम्या/Food/
Mumbai Food : कुरकुरीतपणाचा सुंदर संगम, खिचिया पापड मुंबईत खावा तर इथंच, 40 रुपयांत मन होईल तृप्त, Video









