दरवर्षी काय तेच तेच करायचं, यंदा बाप्पांच्या सजावटीला करा पैठणीचा थाट पाहा Video

Last Updated:

यंदाच्या गणेशोत्सवाला ट्रेंडी टच देण्यासाठी पारंपरिक साड्यांच्या मदतीनं सजावट करता येऊ शकते.

+
News18

News18

मुंबई, 01 सप्टेंबर : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे यंदा बाप्पासाठी सजावट कशी करायची असा तुमचा गोंधळ उडाला असेल. मात्र, यंदाच्या गणेशोत्सवाला ट्रेंडी टच देण्यासाठी पारंपरिक साड्यांच्या मदतीनं सजावट करता येऊ शकते. यासाठी मुंबईच्या बाजारपेठेत पैठणीसाडीपासून बनलेल्या वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. या वस्तूंची खरेदी करून तुम्ही बाप्पाची हटके सजावट करू शकता.
कुठे कराल खरेदी?
मुंबईतील दादर परिसरात असलेल्या नाविन्य हॅण्डलूम स्टुडिओने यंदाचा गणेशोत्सवात इको फ्रेंडली पद्धतीने साजरा व्हावा म्हणून पारंपारिक पैठणीच्यासाडी पासून बाप्पाची आरास तयार केली आहे. सजावटीसाठी लागणारे बॅक ड्रॉप, लोड, फेटा, दागिने, चौरंग, पाट अश्या विविध गोष्टी याठिकाणी उपलब्ध आहेत. तसेच पैठणी सोबत खण्याच्या साडीमध्ये देखील एम्ब्रोईडरी केलेले बॅक ड्रॉप सुद्धा विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत. पैठणीमध्ये असलेले आकर्षक रंग लाल, निळा, हिरवा, भगवा, मोरपिशी या रंगांना सगळ्यात जास्त मागणी आहे.
advertisement
काय आहे किंमत?
लोडचे दोन प्रकार उपलब्ध आहेत. मोठे लोड सोबत कव्हर याची किंमत 1750 रुपये जोडी तर लहान लोड 1000 रुपये जोडी आहेत. दीड मीटर पैठणी बॅकड्रॉप 1150 रुपयेतर खणामध्ये बॅकड्रॉपची किंमत 850 रुपये असून हे सर्व रिअल हॅण्डलूम कपडामध्ये तयार केलं आहे. पैठणीचा पाटाची किंमत 750 रुपये पैठणीच चौरांग कव्हर 550 रुपये आहे. तसंच बाप्पाच्या या आरासला शोभेल असं स्वतःसाठी वस्त्र हव असेल तर ते देखील या ठिकाणी उपलब्ध आहे.
advertisement
50 रुपयांपासून सजावटीच्या वस्तू; बाप्पाच्या आगमनासाठी येथे करा आकर्षक दागिन्यांची खरेदी
पुरुषांसाठी धोतर, कुर्ता, जॅकेट, फेटा, इत्यादी गोष्टी या पैठणीमध्ये उपलब्ध आहेत. तर महिलांसाठी पैठणीसाडी, पैठणी नऊवारीसाडी, सहावारीसाडी असे विविध प्रकार महिलांसाठी देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर लहान मुलांसाठी देखील पैठणीचे वस्त्र या ठिकाणी उपलब्ध होतात, अशी माहिती नाविन्य हॅण्डलूम स्टुडिओच्या सोनाली घाटे यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दरवर्षी काय तेच तेच करायचं, यंदा बाप्पांच्या सजावटीला करा पैठणीचा थाट पाहा Video
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement