50 रुपयांपासून सजावटीच्या वस्तू; बाप्पाच्या आगमनासाठी येथे करा आकर्षक दागिन्यांची खरेदी

Last Updated:

बाप्पाच्या सजावटीसाठी दागिन्यांचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबद्दल माहिती देणार आहोत.

+
News18

News18

मुंबई, 25 ऑगस्ट : गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. प्रत्येकाच्याच घरी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालीय. गणपतीची सजावट, प्रसाद काय असेल किंवा अगदी गणपतीची मूर्ती कोणती आणावी या सगळ्याचीच तयारी सुरु आहे. अशातच आपल्या लाडक्या बाप्पाचं गोजिरवाणं रूप खास पारंपरिक आणि नवीन डिझाईन्सच्या दागिन्यांनी आणखी खुलव असं प्रत्येकाला वाटतं असतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुंबईतील बाजारात दागिन्यांचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याबद्दल माहिती देणार आहोत.
कोण कोणते दागिने आहेत उपलब्ध? 
मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या चिंचपोकळी परिसरातील लालबाग मार्केट मधील भवानी आर्ट्स या दुकानात बाप्पाची आकर्षक आभूषण पाहायला मिळत आहेत. याठिकाणी कंठी, शेला, दागिने, हात, पाय, फुल, शस्त्र, वस्त्र, मुकुट, सोंडपट्टी, भिकबाळी, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगन, कुंडल, दुर्वाचा हार, जास्वंदी फुल, मोत्यांचा हार हे दागिने उपलब्ध आहेत.
advertisement
काय आहे किंमत?
50 रुपयांपासून ते 2000 पर्यंत हे दागिने मिळतात. गणपतीच्या गळ्यातले हार, कंठी अगदी 250 ते 800 पर्यंत इमिटेशन ज्वेलरीमध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ग्राहकांची मागणी असेल त्या किंमतीचे आणि डिझाईनचे दागिने ग्राहकांना तयार करून मिळत आहेत.
advertisement
इमिटेशन ज्वेलरीची क्रेझ
सध्या इमिटेशन ज्वेलरीची क्रेझ वाढलेली दिसत आहे. कंठी, शेला, दागिने, हात, पाय, फुल, शस्त्र, वस्त्र, मुकुट, सोंडपट्टी, भिकबाळी, कमरपट्टा, छत्र, तोडे, कंगन, कुंडल, दुर्वाचा हार, जास्वंदी फुल, कमळ फूलं, मोत्यांचा हार, याकडे भक्तांची ओढ पाहायला मिळत आहे. सर्वात जास्त मागणी बाप्पाचे हात आणि चरण याची आहे. त्यामुळे एक आणि दोन फुटांच्या मूर्तीचे हात आणि चरण हे रेडिमेट मिळतात. हात आणि चरणांची किंमत ही साडेतीनशे रुपयांपासून सुरुवात होऊन ज्या प्रकारे तुम्ही घडवाल तशी त्याची किंमत आकारली जाते.
advertisement
अवघ्या अर्ध्या तासात विरघळेल बाप्पाची मूर्ती; पुण्याच्या मूर्तीकारांना मिळालं भारतातलं पहिलच पेटंट
तसेच वेगवेगळ्या प्रकारचे मुकुट देखील उपलब्ध आहेत. लालबाग राजा मुकुट, दगडूशेठ मुकुट, डोम मुकुट, असे विविध प्रकारचे मुकुट उपलब्ध आहेत. 300 रुपयांपासून ते 1200 रुपयांच्या वर मुकुटांची किंमत आहे, अशी माहिती भवानी आर्ट्स मालक विकास चौधरी यांनी दिली.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
50 रुपयांपासून सजावटीच्या वस्तू; बाप्पाच्या आगमनासाठी येथे करा आकर्षक दागिन्यांची खरेदी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement