advertisement

लेदर खरेदी करताय? खऱ्या आणि खोट्याचा फरक कसा ओळखाल? Follow करा सोप्या टीप्स

Last Updated:

लेदरच्या वस्तूंसाठी धारावीची ओळख प्रसिद्ध आहे. मात्र, लेदर खरेदी करताना खरा आणि खोटा लेदर ओळखणं हे एक मोठं आव्हान असतं.

+
खरा

खरा लेदर आणि खोटा लेदर कसा ओळखावा

निकता तिवारी-प्रतिनिधी
मुंबई : धारावी, जी आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टींपैकी एक म्हणून ओळखली जाते, आता लघु उद्योगांसाठी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनली आहे. विशेषतः लेदरच्या वस्तूंसाठी धारावीची ओळख प्रसिद्ध आहे. मात्र, लेदर खरेदी करताना खरा आणि खोटा लेदर ओळखणं हे एक मोठं आव्हान असतं.

खरा आणि खोटा लेदर कसा ओळखायचा?

  1. मागील बाजू तपासा:
    खऱ्या लेदरची मागील बाजू एकसमान रंगाची असते, तर खोट्या लेदरच्या मागील बाजूस वेगळ्या प्रकारचा कपडा असतो.
  • स्पर्शाने ओळखा:
    खरा लेदर स्पर्शाने नैसर्गिक वाटतो, तर खोट्या लेदरला केमिकलची प्रक्रिया केलेली असते.
  • आगीची चाचणी:
    खऱ्या लेदरवर आग लावली तरी पृष्ठभागावर कोणताही परिणाम होत नाही. मात्र, खोटा लेदर प्लास्टिकसारखा वितळतो.
  • सुगंध तपासा:
    खऱ्या लेदरला नैसर्गिक सुगंध असतो, तर खोट्या लेदरमध्ये कृत्रिम गंध असतो.
  • advertisement
    धारावीत भेट देताना किंवा लेदरची खरेदी करताना हे मुद्दे लक्षात ठेवा, ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.
    view comments
    मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
    लेदर खरेदी करताय? खऱ्या आणि खोट्याचा फरक कसा ओळखाल? Follow करा सोप्या टीप्स
    Next Article
    advertisement
    Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
    बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
    • अजब नशिबाची गजब गोष्ट

    • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

    • पाहा काय आहे नेमका प्रकार

    View All
    advertisement