Happy Ganesh Chaturthi Wishes : बाप्पाच्या मोदकाइतक्याच गोड, प्रियजनांना अशा पाठवा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Last Updated:

Happy Ganesh Chaturthi Wishes In Marathi : घरोघरीही गणेशाचं आगमन होतं. गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाचा उत्सव आणि असा उत्सव म्हणजे एकमेकांना शुभेच्छा देणं आलंच.

News18
News18
मुंबई : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... या जयघोषणात सगळीकडे बाप्पाचं आगमन होत आहे. 27 ऑगस्ट गणेश चतुर्थीला बाप्पा विराजमान होतील. सार्वजनिक गणेशमंडळांचे गणपती तर असतातच. पण घरोघरीही गणेशाचं आगमन होतं. गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाचा उत्सव आणि असा उत्सव म्हणजे एकमेकांना शुभेच्छा देणं आलंच.
गणेशोत्सवासाठी तुमच्या कुटुंबाला, मित्रमैत्रिणींना, खास व्यक्तींना, प्रियजनांना देण्यासाठी हटके अशा शुभेच्छा आम्ही घेऊन आलो आहोत. गणेशोत्सवाच्या अशा शुभेच्छा, ज्या लाडक्या बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाइतक्याच गोड आहेत. ज्या वाचल्यानंतर प्रियजनांचा गणेशोत्सवाचा उत्साह अधिक द्विगुणित होईल.
विघ्नहर्ता आला घरोघरी,
आनंदाचा जल्लोष पसरो दारी,
तुझ्या आयुष्यात सुख-समृद्धीची फुले उमलोत
advertisement
गणेश चतुर्थीच्या मंगल शुभेच्छा!
या पवित्र उत्सवात घराघरात आनंदाचे वातावरण नांदो,
प्रेमाची गोडी वाढो आणि विघ्नहर्त्याचे आशीर्वाद सर्वांना मिळो.
गणेश चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशजी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो,
जीवनात यश आणि सौख्याची फुले उमलू देत.
गणेश चतुर्थी हा फक्त सण नाही, तर नवी आशा घेऊन येणारा पर्व आहे
बाप्पा तुझ्या घरात आनंद, हसरा चेहरा आणि सुख शांती नांदो.
advertisement
गणराया तुझ्या कृपाशीर्वादाने
कुटुंबात एकता, आयुष्यात आनंद आणि कार्यात यश लाभो.
मंगलमय गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.
मोदकाच्या गोडीतून प्रेमाची गोडी वाढो,
बाप्पाच्या आशीर्वादाने नाती घट्ट जुळो,
जीवनात फुलोऱ्यासारखी आनंदाची बरसात होवो.
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!
संकटांच्या छायेतून बाहेर काढून
सुख, शांती आणि समृद्धीच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देवो.
advertisement
शुभ गणेशोत्सव!
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर बाप्पा तुझ्यासोबत असू दे,
त्याचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर सदैव राहू दे.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
गणेशोत्सवाचा हा दिव्य सोहळा,
आनंदाची, श्रद्धेची आणि भक्तीची अमोल भेट घेऊन येवो.
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
मोदकाच्या गोडीतून सुखाची गोडी,
बाप्पाच्या आशीर्वादातून जीवनात भरभराटीची जोडणी.
advertisement
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पा
तुमच्या सर्व संकटांचे निवारण करो
आणि तुमच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी आणो!
गणपती बाप्पाच्या कृपेने
तुमचे जीवन मोदकासारखे गोड आणि आनंदाने भरलेले असो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!
या चतुर्थीला श्रीगणेशाच्या चरणी सर्व अडथळे दूर होवोत,
आयुष्यात सुख-शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभो.
advertisement
बाप्पाची आरती, बाप्पाचे दर्शन आणि बाप्पाचे आशीर्वाद तुझ्या जीवनाला सदैव मंगलमय करो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेश चतुर्थीचा हा मंगल सोहळा
तुझ्या जीवनात नव्या उमेदीनं, नव्या सुरुवातीनं
आणि अखंड आनंदानं उजळून जावो.
गणपती बाप्पा मोरया!
गणेश चतुर्थीचे हे दिवस तुझ्या जीवनात नवी ऊर्जा, नवे यश आणि नवा आनंद घेऊन येवोत.
advertisement
मंगलमय शुभेच्छा!
गणरायाच्या कृपेमुळे तुझ्या प्रत्येक स्वप्नाला नवे पंख लाभोत,
प्रत्येक पावलावर यश मिळो आणि जीवन सुखसमृद्ध होवो.
ढोल ताशांच्या गजरात,
मोदकाच्या सुवासात,
बाप्पा आपल्या भेटीला आले!
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
विघ्नहर्ता श्रीगणेशाच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी लाभो,
नाती अधिक घट्ट होवोत आणि आनंदाचा वर्षाव सदैव होत राहो.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बाप्पा आपल्या आयुष्यात
आनंदाचा, विश्वासाचा आणि सकारात्मकतेचा प्रकाश पसरवो.
शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या!
गणपती बाप्पा मोरया!
तुझं जीवन बाप्पाच्या आशीर्वादाने सुवर्णमयी होवो,
तुझ्या मार्गातील प्रत्येक विघ्न दूर होवो आणि आयुष्य आनंदमय होवो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Happy Ganesh Chaturthi Wishes : बाप्पाच्या मोदकाइतक्याच गोड, प्रियजनांना अशा पाठवा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement