advertisement

Joints Pain : सांधेदुखीपासून सुटका करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, सूज, वेदना होईल कमी

Last Updated:

सांधेदुखीमुळे साधी कामं आव्हानात्मक होऊ शकतात, पण आयुर्वेदात अनेक नैसर्गिक आणि प्रभावी उपचार आहेत. यामुळे वेदना, जडपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते.

News18
News18
मुंबई : सांधेदुखीचा त्रास ज्यांना जाणवतो, त्यांची अनेक कामं कठीण होतात. एलोपथीप्रमाणेच आयुर्वेदातही यावर उपाय आहेत. सांधेदुखीमुळे साधी कामं आव्हानात्मक होऊ शकतात, पण आयुर्वेदात अनेक नैसर्गिक आणि प्रभावी उपचार आहेत. यामुळे वेदना, सांध्यांमध्ये आलेला जडपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते.
अंथरुणातून उठणं किंवा पायऱ्या चढणं यासारख्या साध्या क्रियाही सांधेदुखीमुळे कठीण वाटू शकतात. उपचार केले नाहीत तर स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि हालचालींचा वेग कमी होऊ शकतो. या सर्व हालचाली सुकर व्हाव्यात यासाठी योग्य उपचार करणं खूप महत्वाचं आहे.
advertisement
सांधेदुखी कमी करण्यासाठी तीन आयुर्वेदिक उपचार
1. हळदीचं दूध - नैसर्गिक दाहक-विरोधी हळदीमध्ये कर्क्यूमिन, एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आणि दाहक - विरोधी संयुग, सांधे कडक होणं, सूज आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. एक कप कोमट दुधात, अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी घाला. व्यवस्थित मिसळून प्या.
2. ओवा - ओव्यात थायमॉल असतं, ज्यामध्ये मजबूत वेदनाशामक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ओवा गरम करुन लावल्यानं रक्ताभिसरण सुधारतं आणि सांध्याभोवतालच्या स्नायूंचा कडकपणा दूर होतो. एका तव्यामध्ये दोन चमचे ओवा कोरडा भाजून घ्या. मलमलच्या कापडात किंवा कापसाच्या पिशवीत गुंडाळा आणि दुखणाऱ्या सांध्यावर 10-15 मिनिटं शेका. सांध्यांमधल्या जडपणापासून आराम मिळविण्यासाठी हे दिवसातून एकदा किंवा दोनदा करा.
advertisement
3. अश्वगंधा पावडरही सांधे आणि स्नायू मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. अश्वगंधा हे एक शक्तिशाली ॲडाप्टोजेन आहे. सूज कमी करणं, स्नायूंना बळकटी देणं आणि नुकसान कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे हाडांचं आरोग्य आणि स्नायूंच्या हालचाली सुलभ होतात. अर्धा चमचा अश्वगंधा पावडर गरम दुधात किंवा पाण्यात मिसळून दिवसातून एकदा प्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Joints Pain : सांधेदुखीपासून सुटका करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, सूज, वेदना होईल कमी
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement