Garlic : कोलेस्ट्रॉल नियंत्रण, हृदयाच्या आरोग्यासाठी खा लसूण, रक्तप्रवाह राहिल सुरळीत

Last Updated:

वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी लसूण खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. पण यासाठी लसूण खाण्याची योग्य पद्धत माहित असणं आवश्यक आहे.

News18
News18
मुंबई : वाढलेलं कोलेस्ट्रॉल ही समस्या सध्या गंभीर बनत चालली आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो. पण, यावर लसूण प्रभावी उपाय असू शकतो. लसणामुळे स्वयंपाकाची लज्जत वाढते पण लसणामुळे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत. लसूण योग्यरित्या खाल्ला तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदयाला बळकटी देण्यासाठी याचा उपयोग होतो. वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी लसूण खाल्ला जातो.
लसणामुळे वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात कसं येतं ?
लसणामध्ये असलेला अ‍ॅलिसिन हा घटक यात महत्त्वाचा आहे. अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असल्यानं वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करुन चांगलं कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करणं, धमन्यांमध्ये जमा झालेले थर साफ करण्यास मदत होते.
रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement
हृदय निरोगी ठेवण्यासाठी लसणाचा उपयोग
लसणामुळे रक्तदाब नियंत्रित करता येतो. रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यासाठी याचा उपयोग होतो आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो. रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता कमी करता येते, लसणामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो.
लसूण खाण्याची योग्य पद्धत
advertisement
1. रिकाम्या पोटी कच्चा लसूण खा.
सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या चावल्यानं त्यातील पोषक तत्व थेट रक्तात शोषली जातात. यामुळे हृदय मजबूत होतं आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं.
2. मधासह लसूण खा.
लसूण मधात मिसळून खाणं अधिक प्रभावी आहे, कारण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होऊ शकते.
advertisement
3. लसूण पाणी प्या.
एक ग्लास कोमट पाण्यात लसणाची एक पाकळी मिसळून ते प्यायल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो.
4. लसूण जास्त शिजवणं टाळा.
जास्त शिजवल्यानं लसणातील पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे लसूण थोडा तळून किंवा सॅलडमध्ये कच्चा घालून खा. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची समस्या टाळण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी लसूण खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं. पण, यासाठी लसूण योग्य पद्धतीनं खाणं महत्वाचं आहे. रोजच्या आहारात याचा समावेश केला तर हृदयाचं आरोग्य आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारेल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Garlic : कोलेस्ट्रॉल नियंत्रण, हृदयाच्या आरोग्यासाठी खा लसूण, रक्तप्रवाह राहिल सुरळीत
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement