Kidney Failure : मूत्रपिंडं निकामी होण्यापासून रोखा, आजपासूनच काळजी घ्या
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
किडनीमुळे रक्त स्वच्छ करणं, विषारी पदार्थ काढून टाकणं, तसंच पाणी आणि खनिजांचं संतुलन राखण्याचं काम होतं. पण मूत्रपिंड काम करणं थांबवतं तेव्हा ती एक गंभीर आरोग्य समस्या बनते आणि शरीरावर त्याचे परिणाम दिसून येतात.
मुंबई : मूत्रपिंड म्हणजे शरीराची गाळणी. मूत्रपिंड हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव. कारण किडन्यांमुळे रक्त स्वच्छ करणं, विषारी पदार्थ काढून टाकणं, तसंच पाणी आणि खनिजांचं संतुलन राखण्याचं काम होतं. पण मूत्रपिंड काम करणं थांबवतं तेव्हा ती एक गंभीर आरोग्य समस्या बनते आणि शरीरावर त्याचे परिणाम दिसून येतात.
मूत्रपिंड निकामी होण्याची पाच प्रमुख कारणं समजून घेतली आणि त्यानुसार काळजी घेतली तर मूत्रपिंड दीर्घकाळ निरोगी राहू शकेल. मूत्रपिंड निकामी होण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी काही कारणांकडे लक्ष गेलं नसेल तर ही माहिती नक्की वाचा. कारण याचा थेट परिणाम किडन्यांवर आणि पर्यायानं शरीरावर होतो.
1. उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकतो. मूत्रपिंडाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही तेव्हा ते हळूहळू कमकुवत होतं आणि योग्यरित्या कार्य करणं थांबवतं. यामुळे रक्तदाब नियमित तपासा. मीठ कमी खा आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा असा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
2. मधुमेह
मूत्रपिंड निकामी होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मधुमेह. रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित असते तेव्हा मूत्रपिंडाच्या नळ्यांचं नुकसान होतं आणि हळूहळू मूत्रपिंडांच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा.
3. जास्त प्रमाणात औषध घेणं
advertisement
दीर्घकाळ वेदनाशामक औषधं, अँटीबायोटिक्स किंवा स्टिरॉइड्स घेतल्यानं मूत्रपिंडांवर वाईट परिणाम होतो. अनेक वेदनाशामक औषधं मूत्रपिंडाच्या पेशींना नुकसान पोहोचवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या कार्यावर परिणाम होतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय जास्त काळ कोणतंही औषध घेऊ नका आणि नैसर्गिक उपचारांना प्राधान्य द्या.
4. पाण्याची कमतरता
advertisement
मूत्रपिंडांचं कार्य योग्यरित्या होण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा विषारी पदार्थ काढून टाकण्याची प्रक्रिया मंदावते आणि मूत्रपिंडावर दबाव वाढतो. दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या आणि उन्हाळ्यात अधिक हायड्रेटेड रहा.
5. संसर्ग आणि मूत्रपिंडातील दगड - (किडनी स्टोन)
मूत्रपिंडातील संसर्ग किंवा दगडांमुळे (किडनी स्टोनमुळे) मूत्रपिंडाचं कार्य बिघडू शकतं. वारंवार होणारा मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय) आणि मूत्रपिंडातील दगड (किडनी स्टोन) यामुळे मूत्रपिंड कमकुवत होऊ शकतात. हे टाळण्यासाठी स्वच्छतेची काळजी घ्या, संसर्ग टाळा आणि जास्त पाणी प्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 17, 2025 7:52 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Kidney Failure : मूत्रपिंडं निकामी होण्यापासून रोखा, आजपासूनच काळजी घ्या