Migraine : मायग्रेनचा त्रास लवकर बरा करण्यासाठी महत्त्वाची टिप...डोकेदुखी होईल कमी

Last Updated:

डोकेदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते. पण हल्ली, डोकेदुखी व्यतिरिक्त मायग्रेनची समस्या अधिक सामान्य होताना दिसते आहे. मायग्रेनचा त्रास सहसा डोक्याच्या एका बाजूला होतो. ही वेदना इतकी तीव्र असते की कधीकधी औषधं देखील काम करण्यास वेळ घेतात. यावर औषधं आहेत पण यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले काही सोपे उपायही करुन पाहता येतील. यामुळे थोडा वेळ तरी मायग्रेनमुळे होणाऱ्या त्रासातून आराम मिळेल.

News18
News18
मुंबई : डोकं दुखत असेल तर काही सुचत नाही. डोकेदुखी थांबेपर्यंत शांतपणे काम करणं कठीण होतं. अनेकदा ही डोकेदुखी तीव्र असते तेव्हा डोकं फुटेल असं वाटतं. ही डोकेदुखी मायग्रेनमुळेही होऊ शकते. मायग्रेनमुळे जास्त प्रकाशही सहन करता येत नाही. यावर औषधं आहेत पण यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले काही सोपे उपायही करुन पाहता येतील. यामुळे थोडा वेळ तरी मायग्रेनमुळे होणाऱ्या त्रासातून आराम मिळेल.
डोकेदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते. पण हल्ली, डोकेदुखी व्यतिरिक्त मायग्रेनची समस्या अधिक सामान्य होताना दिसते आहे. मायग्रेनचा त्रास सहसा डोक्याच्या एका बाजूला होतो. ही वेदना इतकी तीव्र असते की कधीकधी औषधं देखील काम करण्यास वेळ घेतात. औषधं घेऊनही त्याचा परिणाम होण्यासाठी वेळ लागतो. याशिवाय, जेव्हा एखाद्या व्यक्तीला मायग्रेनचा त्रास होतो तेव्हा त्याला मळमळ, उलट्या होतात. प्रकाश आणि मोठा आवाजही सहन होत नाही.
advertisement
मायग्रेनचा त्रास का होतो ते जाणून घेऊया -
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मायग्रेन होण्याचं कोणतंही एक कारण नाही, पण काही गोष्टींमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. खूप ताण घेतल्यानं, पुरेशी झोप न मिळाल्यानं, जास्त प्रकाश किंवा मोठा आवाज बराच वेळ ऐकण्यामुळे मायग्रेनचा त्रास होतो. खूप काळ उपाशी राहणं किंवा उशिरा जेवणं तसंच हार्मोनल बदलांमुळेही डोकं दुखू शकतं. महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान डोकं दुखू शकतं. या सर्वांव्यतिरिक्त, वाईट आहारामुळे देखील मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
advertisement
हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध डॉक्टर सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये,डॉक्टरांनी सांगितलेला उपाय, करुन पाहायला हरकत नाही. या उपायामुळे मायग्रेनची समस्या पूर्णपणे नाहीशी होऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
advertisement
मायग्रेनवर नियंत्रण ठेवण्याचे आणि वेदना ताबडतोब कमी करण्याचे अनेक प्रभावी मार्ग आहेत. गरम पाण्यात पाय भिजवून ठेवणं हा त्यातलाच एक उपाय आहे. मायग्रेनचा त्रास होत असेल तर पाय काही वेळ गरम पाण्यात बुडवू शकता. डॉ. सेठी यांच्या मते, मायग्रेन दरम्यान डोक्यात रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे वेदना आणि दाब येतो. या स्थितीत, पाय गरम पाण्यात ठेवल्यानं शरीराच्या रक्ताभिसरणात थोडासा बदल होतो.
advertisement
गरम पाण्यामुळे पायांमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि डोक्यातून होणारा रक्तदाब कमी होतो. यामुळे मेंदूच्या नसांवरील ताण कमी होतो आणि वेदनेपासून आराम मिळतो. ही पद्धत मायग्रेनवर उपचार नाही, परंतु ती निश्चितच वेदनेपासून आराम देऊ शकते. डॉ. सेठींव्यतिरिक्त, काही इतर आरोग्य अहवालांमधूनही ही पद्धत फायदेशीर असल्याचं निष्पन्न झालं आहे. गरम पाण्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि ताण कमी होतो. हा ताण अनेकदा मायग्रेनचं एक प्रमुख कारण असू शकतं. त्यामुळे,ज्यांना वारंवार औषधं घ्यायची नाहीत त्यांच्यासाठी ही पद्धत विशेषतः उपयुक्त ठरू शकते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Migraine : मायग्रेनचा त्रास लवकर बरा करण्यासाठी महत्त्वाची टिप...डोकेदुखी होईल कमी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement