अरे वाह! दिवाळी आधी शनी चाल बदलणार, या 3 राशींना मालामाल करणार, धनसंपत्तीत दुप्पटीने वाढ होणार

Last Updated:
Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनी हा कर्मफळदाता ग्रह मानला जातो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शनी फळ देतो, असे शास्त्र सांगते. यंदा दिवाळीचा सण 20 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा होणार आहे.
1/5
astrology news
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनी हा कर्मफळदाता ग्रह मानला जातो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार शनी फळ देतो, असे शास्त्र सांगते. यंदा दिवाळीचा सण 20 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा होणार आहे. मात्र, त्याआधीच शनी महाराज आपल्या चालीत मोठा बदल करणार आहेत. त्यामुळे अनेक राशींच्या जीवनात महत्त्वाचे बदल घडून येतील, असा ज्योतिषांचा अंदाज आहे.
advertisement
2/5
शनी
सध्या शनी उत्तर भाद्रपद नक्षत्रात आहे. येत्या 3 ऑक्टोबर 2025 रोजी शुक्रवारी रात्री 9 वाजून 49 मिनिटांनी शनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हा प्रवास 20 जानेवारी 2026 पर्यंत सुरू राहील. दिवाळीपूर्वी होणारे हे नक्षत्र संक्रमण अत्यंत परिणामकारक मानले जात असून काही राशींसाठी ते विशेष लाभदायी ठरणार आहे.
advertisement
3/5
मिथुन रास
मिथुन रास -   मिथुन राशीच्या जातकांसाठी शनीचे हे संक्रमण सुखदायक ठरणार आहे. या काळात धनप्राप्तीच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. तुमचे थांबलेले कामे पुन्हा गतीमान होतील. व्यापारी वर्गाला व्यवसाय विस्ताराची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा मिळून प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. तसेच, वैयक्तिक आयुष्यातील तणाव कमी होऊन समाधान लाभेल. शनीची कृपा लाभल्याने अडथळे दूर होऊन यशाचा मार्ग सुकर होईल.
advertisement
4/5
तूळ रास
तूळ रास -   तूळ राशीसाठी शनीचे हे नक्षत्र संक्रमण अत्यंत शुभकारक ठरेल. या काळात तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. जुने गुंतवणूक निर्णय आता फायदेशीर ठरतील. नोकरी करणाऱ्यांना बढतीची किंवा वेतनवाढीची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षमतेची दखल घेतली जाईल आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. या काळात तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी निर्णायक पावले उचलाल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालविण्याची संधी मिळेल.
advertisement
5/5
कुंभ रास
कुंभ रास -   कुंभ राशीच्या जातकांसाठी शनीचे पूर्व भाद्रपद नक्षत्रातले आगमन अतिशय शुभ ठरणार आहे. या काळात आर्थिक स्थितीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल. नशिबाची साथ असल्यामुळे महत्त्वाचे निर्णय धाडसाने घेता येतील. व्यापारी क्षेत्रात नवे करार होण्याची शक्यता असून ते लाभदायक ठरतील. मित्रपरिवाराची साथ आणि मदत तुमच्या यशाला बळकटी देईल. वैयक्तिक जीवनात शांती आणि समाधान लाभेल. नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याची क्षमता वाढेल.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement