Water Transport: लोकल आणि टॅक्सी विसरा! आता बोटीने करा प्रवास, जलवाहतुकीसाठी नवीन मार्ग होणार खुले
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Water Transport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चार नव्या जलमार्गांनी जोडलं जाणार आहे.
नवी मुंबई : सध्या मुंबईसह नवी मुंबईचा झपाट्याने विकास होत आहे. नवी मुंबईत नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ उभारण्यात आलं असून लवकरत ते कार्यान्वित देखील होणार आहे. शिवाय विमानतळाची कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अनेक रस्त्यांचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या कनेक्टिव्हिटीमध्ये आता जलमार्गाचीही भर पडणार आहे. मेरिटाईम बोर्डाने मुंबई महानगर प्रदेशातील सध्याच्या 12 जलवाहतूक मार्गांचा विस्तार करण्यासह नवीन 10 मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेरिटाईम बोर्डाने यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. कोची मेट्रो रेलची एकमेव निविदा आली झाली आहे. त्यांनी डीपीआर सादर केल्यानंतर 10 नव्या मार्गांवर स्पीडबोटी, रो-रो सेवा आणि वॉटर टॅक्सी धावताना दिसणार आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ चार नव्या जलमार्गांनी जोडलं जाणार आहे.
advertisement
सध्या 12 मार्गावर जलवाहतूक सुरू असल्याचं सांगितलं जातं. मात्र, यापैकी न्यू फेरी वॉर्फ-मोरा, न्यू फेरी वॉर्फ-रेवस आणि बेलापूर-नेरूळ मार्ग कागदावरच आहेत. अर्नाळा ते अर्नाळा किल्ला, वसई-भाईंदर, वर्सोवा-मढ, गोराई-बोरीवली, बोरीवली-एसेल वर्ल्ड, मार्वे-मनोरी, गेटवे ऑफ इंडिया-मांडवा, गेटवे ऑफ इंडिया एलिफंटा या मार्गांत सुधारणा केली जाणार आहे.
नवीन जल मार्गांमुळे, मुंबई-नवी मुंबईसह कल्याण-डोंबिवली, ठाणे, भिवंडी, मीरा-भाईंदर वसई आणि नजीकच्या उरणसारख्या बंदरांवरही चाकरमान्यांना कॅटमरान, स्पीड बोटींसह रो-रो पॅक्सने ये-जा करता येणार आहे. सध्या भाऊचा धक्का ते रेवस, करंजा, मोरा, धरमतर मार्गावर प्रवासी जलवाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवासाचं अंतर कमी होऊन इंधनासह वेळेचीही बचत होईल. शिवाय प्रदूषण आणि अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
advertisement
प्रस्तावित नवीन 10 जलमार्ग
- वसई ते काल्हेर हा मार्ग वसई-मीरा भाईंदर फाउंटेन जंक्शन, गायमुख, नागला बंदर, काल्हेरपर्यंत जाणार
- कल्याण ते कोलशेत मार्गे कल्याण-मुंब्रा-काल्हेर-कोलशेत जोडले जाणार.
- काल्हेर ते नवी मुंबई विमानतळ मार्गावर काल्हेर-मुलुंड-ऐरोली- वाशी- नवी मुंबई विमानतळ ही ठिकाणं असतील.
- वाशी ते नवी मुंबई विमानतळ
- बेलापूर ते नवी मुंबई विमानतळ
advertisement
- गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई विमानतळ
- गेट वे ऑफ इंडिया ते वाशी
- वसई ते मार्वे
- बोरीवली ते बांद्रा मार्ग बोरीवली-मार्वे-वर्सोवा-बांद्रा
- बांद्रा ते नरिमन पॉईंट मार्ग हा बांद्रा-वरळी-नरिमन पॉईंट
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
September 14, 2025 11:42 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Water Transport: लोकल आणि टॅक्सी विसरा! आता बोटीने करा प्रवास, जलवाहतुकीसाठी नवीन मार्ग होणार खुले