No Sugar : साखरेला करा बाय बाय, शरीरात होतील सकारात्मक बदल

Last Updated:

साखर खाणं थांबवल्यानं अधिक उत्साही, निरोगी आणि आनंदी वाटतं. म्हणून साखरेचं मर्यादित सेवन आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणं शरीर स्वास्थ्यासाठी उत्तम आहे. साखर जास्त खाल्ल्यानं अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आहारातून साखर कमी करणं किंवा पूर्णपणे बंद करण्यानं शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसतात.

News18
News18
मुंबई : आपण खात असलेल्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये साखर असते. त्याव्यतिरिक्त चहा किंवा इतर पदार्थांमध्ये असलेल्या साखरेवर आपण नियंत्रण ठेऊ शकतो. दोन महिने साखर खाणं नियंत्रित केलं तर शरीरात अनेक चांगले बदल होतील.
साखर खाणं थांबवल्यानं अधिक उत्साही, निरोगी आणि आनंदी वाटतं. म्हणून साखरेचं मर्यादित सेवन आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणं शरीर स्वास्थ्यासाठी उत्तम आहे. साखर जास्त खाल्ल्यानं अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आहारातून साखर कमी करणं किंवा पूर्णपणे बंद करण्यानं शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसतात.
कमी साखर खाऊन किंवा साखर खाणं थांबवून शरीरात मोठे बदल घडवून आणणं शक्य आहे. दोन महिने साखरेचं प्रमाण नियंत्रित केलं वजन कमी होईल, पचनशक्तीही सुधारेल. शरीराबरोबरच मानसिक आरोग्यासाठीही साखर खाणं टाळलेली बरी.
advertisement
1. वजन कमी होईल.
साखरेमध्ये असलेल्या कॅलरीज वजन वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहेत. साखरेचं प्रमाण कमी केलं की, शरीरात अतिरिक्त चरबी साठणं थांबतं. यामुळे हळूहळू वजन कमी होऊ शकतं. पोट आणि कंबरेभोवतीची चरबी हळूहळू कमी होते.
advertisement
2. सक्रियता वाढेल.
जास्त साखर खाल्ल्यानं शरीरात सुस्ती आणि थकवा येतो. साखरेचं प्रमाण कमी केल्यानं शरीराची ऊर्जा पातळी सुधारेल आणि दिवसभर सक्रिय वाटेल.
3. त्वचेचं आरोग्य सुधारतं.
जास्त साखरेचं खाल्ल्यानं त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो, यामुळे मुरुम आणि सुरकुत्या वाढू शकतात. साखर कमी खाल्ल्यानं त्वचा अधिक स्वच्छ, तरुण आणि चमकदार दिसते.
advertisement
4. रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहील.
साखर खाल्ल्यानं रक्तातील साखरेच्या पातळीत वेगानं चढ-उतार होतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. साखर कमी केल्यानं इन्सुलिनची पातळी संतुलित राहते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.
5. पचनसंस्था चांगली राहील.
जास्त साखर खाल्ल्यानं पोटात गॅस, आम्लता आणि पोट फुगणं या समस्या जाणवतात. साखरेचे प्रमाण कमी केल्यानं पचनसंस्था मजबूत आणि निरोगी होते.
advertisement
6. मानसिक आरोग्य सुधारतं.
जास्त साखर खाल्ल्यानं मूड स्विंग, तणाव आणि नैराश्य येऊ शकतं. साखर कमी केल्यानं मानसिक संतुलन सुधारेल आणि ताण कमी होईल.
साखर कशी कमी करावी?
प्रक्रिया केलेलं आणि पॅकेज केलेलं अन्न खाणं टाळा.
नैसर्गिक गोडव्यासाठी साखरेऐवजी फळं आणि मध खा.
जास्त पाणी प्या आणि आहार चांगला करा.
advertisement
साखरेचं प्रमाण हळूहळू कमी करा जेणेकरून शरीराला सहजपणे जुळवून घेण्याची सवय लागेल. हा बदल चांगल्या प्रकृतीसाठी आवश्यक आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
No Sugar : साखरेला करा बाय बाय, शरीरात होतील सकारात्मक बदल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement