Eggs : अंड खा, तंदुरुस्त राहा, डोळे, स्नायू, स्मरणशक्तीसाठी पौष्टिक आहार
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
अंड हे प्रथिनांसाठीचा उत्तम स्रोत आहे. स्नायूंची बळकटी, स्मरणशक्ती, वजन व्यवस्थापन, मेंदूचं आरोग्य, डोळ्यांसाठी अंड उपयुक्त आहे.
अंमुंबई : सकाळी न्याहारीला काय खायचं हा रोजचा प्रश्न....अनेक घरांत पोहे, उपम्याप्रमाणेच अंड्याचं ऑम्लेट किंवा अंड उकडून खाल्लं जातं. अंड आपल्या शरीरासाठी पौष्टिक अन्न आहे. रिकाम्या पोटी म्हणजे न्याहारीला अंड खाण्याचे अनेक फायदे आहेत.
नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणापर्यंत अंड्यांचा वापर करुन भरपूर पदार्थ बनवता येतात. चवीबरोबरच आरोग्यासाठीही अंड हा चांगला स्रोत आहे. कारण त्यात प्रथिनं, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, कोलीन, लोह, ल्युटीन, झेक्सॅन्थिन, रिबोफ्लेविन, पॅन्टोथेनिक अॅसिड, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन ए हे सर्व घटक असतात.
advertisement
1. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगला स्रोत - रिकाम्या पोटी अंडी खाल्ली तर ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकते. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती शरीराला अनेक प्रकारच्या संसर्गांपासून वाचवण्यास मदत करते.
2. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त - सकाळी रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्यानं जास्त खाणं टाळता येतं, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास देखील मदत होते. ज्यांना वजन कमी करायचं आहे ते नाश्त्यात उकडलेलं अंड खाऊ शकतात. यामुळे बराच काळ भूक लागत नाही आणि त्यामुळे जास्तीचं अन्न खाल्लं जात नाही.
advertisement
3. शरीराला आवश्यक ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त - शरीरात उर्जेची कमतरता वाटत असेल तर रिकाम्या पोटी अंडी खाऊ शकता. कारण अंड्यांमध्ये असलेले गुणधर्म ऊर्जा वाढवण्याचं काम करू शकतात. शरीराला पुरेशी शक्ती देण्यासाठी अंड उपयुक्त आहे.
4. मेंदूसाठी फायदेशीर - सकाळी रिकाम्या पोटी अंडी खाणं मेंदूच्या आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं.
advertisement
5. अंड्यांमधले अनेक गुणधर्म डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसंच हृदयविकार, स्मरणशक्ती वाढवण्यासाठीही अंड उपयुक्त आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 15, 2025 6:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Eggs : अंड खा, तंदुरुस्त राहा, डोळे, स्नायू, स्मरणशक्तीसाठी पौष्टिक आहार