Hair Care : केस गळतीवर पारंपरिक उपाय, मेथीच्या दाण्यांचा असा करा उपयोग
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केस गळती रोखण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त ठरु शकतात, त्यांचा वापर असा करावा याबाबत तज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्यामुळे केस गळतीची चिंता सोडा. मेथीमध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या वाढीला चालना देतात. डोक्यातील कोंडा आणि केस तुटणं रोखण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त ठरतात.
मुंबई : हवामान बदललं की केसांच्या समस्या वाढतात. आता सुरु असलेल्या उन्हाळ्यात, ऊन, धूळ, माती आणि घामामुळे केस कोरडे आणि कमकुवत होतात. केस गळतीचं प्रमाणही लक्षणीय वाढतं.
केस गळती रोखण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त ठरु शकतात, त्यांचा वापर असा करावा याबाबत तज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्यामुळे केस गळतीची चिंता सोडा. मेथीमध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या वाढीला चालना देतात. डोक्यातील कोंडा आणि केस तुटणं रोखण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त ठरतात.
advertisement
केसांसाठी मेथीचे फायदे -
मेथीचे दाणे केसांना मजबूत, जाड आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. प्रथिनं आणि निकोटिनिक अॅसिडमुळे केस आतून मजबूत होतात आणि केस गळतीची समस्या कमी होते. मेथीच्या दाण्यांमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात, कोंड्यामुळे होणाऱ्या बुरशीला किंवा संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी हा गुणधर्म उपयुक्त ठरतो.
advertisement
केस गळती रोखण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर -
केसांच्या आरोग्यासाठी मेथीचं तेल वापरू शकता. हे तेल बनवण्यासाठी, प्रथम एका भांड्यात नारळाचं तेल घ्या आणि त्यात मेथीचे दाणे घाला आणि ते उकळू द्या. मेथीचे दाणे उकळून चांगले शिजले की, तेल गॅसवरून काढून बाजूला ठेवा. तेल थोडं थंड झाल्यावर या तेलानं केसांमध्ये मालिश करा आणि काही वेळ तसंच राहू द्या. नंतर सौम्य शॅम्पूनं केस धुवा. मेथीच्या दाण्यांचा वापर आठवड्यातून दोनदा करू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 12, 2025 5:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : केस गळतीवर पारंपरिक उपाय, मेथीच्या दाण्यांचा असा करा उपयोग