Nerve Weakness : नसा कमकुवत होण्यामागची कारणं ओळखा, वेळीच उपचार घ्या, तंदुरुस्त राहा

Last Updated:

नसा कमकुवत होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे जीवनसत्त्वांची कमतरता. विशेषतः व्हिटॅमिन बी 1 (थायमिन) आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता हे मज्जातंतूंच्या कमकुवतपणाचं एक प्रमुख कारण आहे. पण, योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीनं यावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. वेदना, सूज यापैकी कोणतीही लक्षणं जाणवत असतील तर ताबडतोब आहाराकडे लक्ष देऊन आवश्यक पावलं उचलण्याची गरज आहे .

News18
News18
मुंबई : योग्य आहार मिळत नसेल तर शरीराकडून आपल्याला अनेक संकेत मिळतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना आणि सूज जाणवत असेल तर जीवनसत्वांच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. शरीराच्या नसा मज्जासंस्थेचा एक प्रमुख भाग. संपूर्ण शरीरात संदेश पाठवणं, शरीराच्या सर्व क्रियांसाठीची तत्परता नसांमुळे शक्य होते. पण, नसा कमकुवत होतात तेव्हा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
नसा कमकुवत होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे जीवनसत्त्वांची कमतरता. विशेषतः व्हिटॅमिन बी 1 (थायमिन) आणि व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता हे मज्जातंतूंच्या कमकुवतपणाचं एक प्रमुख कारण आहे. पण, योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीनं यावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. वेदना, सूज यापैकी कोणतीही लक्षणं जाणवत असतील तर ताबडतोब आहाराकडे लक्ष देऊन आवश्यक पावलं उचलण्याची गरज आहे.
advertisement
मज्जातंतू कमकुवत होण्याची कारणं समजून घेऊया -
1. व्हिटॅमिन बी 1 (थायमिन) ची कमतरता -
शरीरात ऊर्जा वाढवण्यात आणि मज्जासंस्थेचं कार्य राखण्यात व्हिटॅमिन बी 1 मोठी भूमिका आहे. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं.
व्हिटॅमिन बी 1 च्या कमतरतेची लक्षणं
advertisement
सुन्नपणा आणि मुंग्या येणं
स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवणं
थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येणं
व्हिटॅमिन बी 1 च्या कमतरतेची कारणं -
अल्कोहोलचं जास्त सेवन
पौष्टिक अन्नाचा अभाव
आहारात काही पदार्थांचा समावेश करुन व्हिटॅमिन बी 1 किंवा थायमिनची कमतरता पूर्ण करता येते. आहारात संपूर्ण धान्य, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया आणि डाळींचा समावेश आवर्जून करा.
advertisement
2. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता
रक्त आणि मज्जातंतूंच्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे केवळ नसा कमकुवत होतातच असं नाही तर अशक्तपणा देखील होऊ शकतो.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणं
हात आणि पायांमध्ये मुंग्या येणं
स्मरणशक्ती कमी होणं
थकवा आणि चिडचिड होणं
advertisement
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची कारणं:
अपुरा आहार आणि वयानुसार पदार्थांमधले पोषक घटक कमी प्रमाणात शोषले गेल्यामुळेही कमतरता जाणवू शकते.
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्याचे मार्ग:
दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे आणि गोमांस यासारखे पदार्थ तर शाकाहारींसाठी तृणधान्यं आणि व्हिटॅमिन बी 12 पूरक आहार घेणं आवश्यक आहे.
जीवनसत्वांची कमतरता जाणवू नये यासाठी
advertisement
संतुलित आहार घ्या: आहारात व्हिटॅमिन बी 1आणि बी 12 समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
वेळेवर तपासणी करा: वेळोवेळी तुमच्या व्हिटॅमिनची पातळी तपासा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Nerve Weakness : नसा कमकुवत होण्यामागची कारणं ओळखा, वेळीच उपचार घ्या, तंदुरुस्त राहा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement