Health Care : बेदाणे-बदाम एकत्र खाण्याचे फायदे, शरीराच्या अंतर्गत मजबुतीसाठी वरदान
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मनुका-बदाम नियमित खाल्ल्यानं अनेक आरोग्य समस्या दूर होतात आणि शरीर मजबूत होतं. मनुका आणि बदाम योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं खाल्ले तर आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.
मुंबई : आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी सुका मेवा फायदेशीर ठरतो. सुका मेव्यातील बेदाणे आणि बदाम हे मिश्रण शरीराला आतून मजबूत आणि बाहेरून सुंदर बनवण्यास उपयुक्त आहे. मनुका चविष्ट असतात, तसंत त्यात अनेक पोषक तत्वंही भरपूर असतात. आयुर्वेदात मनुका आणि बदाम यांचं मिश्रण शरीरासाठी वरदान मानलं जातं.
मनुका-बदाम नियमित खाल्ल्यानं अनेक आरोग्य समस्या दूर होतात आणि शरीर मजबूत होतं. मनुका आणि बदाम योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं खाल्ले तर आरोग्यासाठी लाभदायक ठरतात.
बदाम आणि मनुका खाण्याचे आरोग्यदायी फायदे
1. प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त
मनुकांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व असतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी याची मदत होते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात, शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी याचा उपयोग होतो. हंगामी आजारांपासून संरक्षण करणं आणि शरीराला शक्ती आणि ऊर्जा प्रदान करण्यासाठी बदाम - बेदाणे फायदेशीर ठरतात.
advertisement
2. पचनसंस्थेत सुधारणा
मनुकांमध्ये फायबर असतं, यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. बदामांमुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. पचन प्रक्रिया जलद होते आणि पोट हलकं आणि स्वच्छ राहतं.
3. हाडांच्या मजबुतीसाठी उपयोगी
मनुकांमध्ये कॅल्शियम आणि बोरॉनसारखे घटक असतात, हाडांच्या आरोग्यासाठी या घटकांची मदत होते. बदामांमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असल्यानं हाडं मजबूत होतात. हाडं मजबूत आणि निरोगी राहिल्यानं, संधिवातासारख्या समस्यांचा धोका कमी होतो.
advertisement
4. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
बेदाणे आणि बदाम नियमित खाल्ल्यानं त्वचा आणि केसांचं पोषण चांगलं होतं. मनुकांमुळे त्वचेला चमक येते आणि बदाम केसांना मजबूत आणि जाड बनवतात. त्वचा उजळते आणि केस गळण्याची समस्या कमी होते.
5. हृदयाचं आरोग्य सुधारण्यासाठी फायदेशीर
advertisement
बदामामध्ये असलेले ओमेगा-3 आणि बेदाण्यांमध्ये असलेलं पोटॅशियम हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. सामान्य रक्तदाब राखण्यासाठीही बेदाणे-बदाम उपयुक्त आहेत.
6-8 बेदाणे आणि 4-5 बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी रिकाम्या पोटी खा. मनुके/ बेदाण्यांचं अतिसेवन टाळा. बेदाणे किंवा बदाम खाऊन अॅलर्जी येत असेल तर ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 12, 2025 6:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Care : बेदाणे-बदाम एकत्र खाण्याचे फायदे, शरीराच्या अंतर्गत मजबुतीसाठी वरदान