Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वादळी पाऊस, 48 तास महत्त्वाचे, पुण्यासह 5 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather alert: पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून पुढील 48 तासांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
1/7
मान्सूनच्या परतीस पोषक हवामान तयार झाले अशून पुढील 48 तासात पश्चिम राजस्थानातून मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज 14 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच कमाल तापमानाचा पारा 28.4 अंश सेल्सिअसवर स्थिर राहिला. आज पुणे जिल्ह्यात तापमान स्थिर राहणार असले तरीही आकाश मात्र ढगाळ राहून 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगवान वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. रविवारी पुण्यासह पुणे घाटमाथ्यास विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

3/7
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात पावसाची उघडीप राहिली. मात्र पुढील दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचे असणार आहेत. रविवारी आणि सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात गडगडाटी वादळासह मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोल्हापूर सह कोल्हापूर घाटमाथ्यास सतर्कतेचा यलो अलर्ट असणार आहे.

4/7
गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यामध्ये 0.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच 28.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. रविवारी विजांसह पावसाची शक्यता असून कमाल तापमान 29 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस इतके राहील. हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सांगलीला यलो अलर्ट जारी केला आहे.

5/7
सातारा जिल्ह्यात शनिवारी 3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात साताऱ्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहील. रविवारी सातारा जिल्ह्यात विजांसह 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगवान वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये. तसेच पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. सातारा घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.

6/7
सोलापूर जिल्ह्यातील उष्णतेची तीव्रता कमी झाली असून शनिवारी 28 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तसेच 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील 24 तासात देखील जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून सतर्कतेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

7/7
राज्यात ढगाळ वातावरण कायम आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. आजचा रविवार वादळी वाऱ्यासह पावसाचा असल्याने विशेषत: पर्यटकांना योग्य खबरदारी घ्यावी लागेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement