"भारत vs पाकिस्तान 'मॅच फिक्स', टीम इंडियाच्या खेळाडूंना लाजा वाटल्या पाहिजे", संजय राऊत भडकले!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sanjay Raut On Ind vs Pak Match : जय शहा तिकडे बसले आहेत, याचा अर्थ नक्कीच गँबलिंग होणार. या मॅचमध्ये दीड लाख कोटी रुपयांचे गँबलिंग झालं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut Allegation On BCCI : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप सामन्याला परवानगी दिल्याबद्दल उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. "भारत-पाकिस्तान मॅचला परवानगी देणं ही भारतीय जनता पक्षाची दिवाळखोरी आहे," असं म्हणत त्यांनी भाजपच्या राष्ट्रभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माझ्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेटपटूंना ही मॅच खेळायची नाही, पण जय शहा यांचा त्यांच्यावर दबाव आहे, असं म्हणत संजय राऊतांनी खळबळ उडवून दिलीये.
दीड लाख कोटी रुपयांचे गँबलिंग
संजय राऊत म्हणाले, भाजपचे राष्ट्रभक्त हे ढोंग आहे. 'BJP के पप्पा वॉर रुका सकते हे, पण भारत-पाकिस्तान मॅच रुका नही सकते,' हे त्यांनी दाखवून दिले आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षानेही या मॅचला विरोध केल्याचे त्यांनी सांगितलं. राऊत यांनी मॅचमध्ये मोठ्या प्रमाणात 'गँबलिंग' होत असल्याचा आरोप केला. "दुबईत तिकिटे विकली जात नाहीत, पण जय शहा तिकडे बसले आहेत, याचा अर्थ नक्कीच गँबलिंग होणार. या मॅचमध्ये दीड लाख कोटी रुपयांचे गँबलिंग झालं आहे," असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
advertisement
क्रिकेटपटूंना लाजा वाटल्या पाहिजे
राऊत पुढे म्हणाले, "माजी क्रिकेटपटूंनी या मॅचला विरोध केला, पण जे मॅच खेळणार आहेत त्यांनी विरोध केला पाहिजे होता. त्यांनी विरोध केला असता तर जय शहा आणि अमित शहा काय त्यांना फासावर चढवणार होते का? सामना खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना लाजा वाटल्या पाहिजे. भारतीय क्रिकेटपटूंना ही मॅच खेळायची नाही, पण जय शहा यांचा त्यांच्यावर दबाव आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
advertisement
बाळासाहेब असते तर दुबईचा आजचा सामना...
दरम्यान, नैतिकतेच्या दृष्टीने अशिष शेलार यांनी राजीनामा दिला पाहिजे होता. अमित शाह, एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब असते तर दुबईचा आजचा सामनाही झाला नसता, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 11:15 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
"भारत vs पाकिस्तान 'मॅच फिक्स', टीम इंडियाच्या खेळाडूंना लाजा वाटल्या पाहिजे", संजय राऊत भडकले!