IND vs PAK : टीम इंडियाला 'ग्रीन सिग्नल' देऊन BCCI कलटीच्या मार्गावर! कॅमेऱ्यासमोर येणारा तो अधिकारी कोण?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
BCCI officials boycott IND vs PAK : भारत पाकिस्तान मॅचला बीसीसीआयचे अधिकारी उपस्थित राहणार नाहीत. मॅचमध्ये भारताचा विजय निश्चित झाल्यावरच बीसीसीआयचा एखादा पदाधिकारी कॅमेऱ्यासमोर येण्याची शक्यता आहे.
India vs Pakistan Match : आशिया कप (Asia Cup 2025) मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी ग्रीन सिग्नल दिला असला, तरी बीसीसीआयचे उच्चपदस्थ अधिकारी मात्र या मॅचला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, एकच अधिकारी दुबईला जाण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना कॅमेऱ्यात 'नो एन्ट्री'
एका प्रसिद्ध संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, मॅचमध्ये भारताचा विजय निश्चित झाल्यावरच बीसीसीआयचा एखादा पदाधिकारी कॅमेऱ्यासमोर येण्याची शक्यता आहे. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'पाकिस्तानसोबत खेळण्याची परवानगी सरकारकडून मिळाल्यावरच आम्ही मॅचसाठी तयारी दर्शवली. पण तरीही देशात या मॅचला विरोध होत आहे. अशा वेळी मॅच सुरू असताना कॅमेऱ्यासमोर आल्यास आमच्याबद्दल चुकीचे वातावरण निर्माण होऊ शकते, अशी भीती वाटते.'
advertisement
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची दांडी
भारत-पाकिस्तान मॅचसाठी बीसीसीआयचे जास्तीत जास्त अधिकारी उपस्थित राहतात. मात्र, या वेळी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया, आयपीएल अध्यक्ष अरुण घुमल, खजिनदार प्रभतेज भाटिया आणि सहसचिव रोहन देसाई यांच्यापैकी कुणीही दुबईला जाणार नाही. आयसीसी अध्यक्ष जय शहा अमेरिकेत असल्यामुळे तेही या मॅचला उपस्थित राहणार नाहीत. भारत पाकिस्तान सामन्यावरून जय शहा यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
advertisement
BCCI चा तो एक अधिकारी कोण?
अशा परिस्थितीत, बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रशासकीय सदस्य राजीव शुक्ला हेच या मॅचसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजीव शुक्ला यांचा क्लिन चेहरा असल्याने ते सामन्यानंतर उपस्थित राहू शकतात. राजीव शुक्ला हे सामन्यादरम्यान नव्हे तर सामना झाल्यानंतर कॅमेऱ्यासमोर दिसण्याची शक्यता आहे. तोपर्यंत टीम इंडिया पाकिस्तानला लोळवेल, याच शंका नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 10:42 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : टीम इंडियाला 'ग्रीन सिग्नल' देऊन BCCI कलटीच्या मार्गावर! कॅमेऱ्यासमोर येणारा तो अधिकारी कोण?