NCP Sharad Pawar : ''देवा भाऊ” नंतर 'देवा तूच सांग...’' शरद पवार गटाच्या जाहिरातीने राजकारण तापलं!

Last Updated:

NCP Sharad Pawar :“देवा तूच सांग…” या शीर्षकाखाली दिलेल्या या जाहिरातीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

देवा भाऊ” नंतर “देवा तूच सांग’’... शरद पवार गटाच्या जाहिरातीने राजकारण तापलं!
देवा भाऊ” नंतर “देवा तूच सांग’’... शरद पवार गटाच्या जाहिरातीने राजकारण तापलं!
नाशिक: मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचे शासकीय आदेश काढल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी ‘देवाभाऊ’ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह होर्डिंग आणि जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर विरोधकांकडून आता याच जाहिरातीचा धागा पकडून सरकारवर टीका करण्यात येणार असल्याचे चित्र आहे.
उद्या, सोमवारी 15 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून आज वर्तमानपत्रांत दिलेली जाहिरात चांगलीच चर्चेत आली आहे. “देवा तूच सांग…” या शीर्षकाखाली दिलेल्या या जाहिरातीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर राज्यभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “देवा भाऊ” अशा आशयाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतानाचे फलक व जाहिराती लागल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून शरद पवार गटाने आजची जाहिरात प्रसिद्ध केल्याचे बोलले जात आहे.
advertisement
या जाहिरातीतील मजकूर आणि मांडणीवरून फडणवीस यांना उपरोधिक टोला लगावण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, उद्या होणाऱ्या नाशिक मोर्चाच्या आधीच या जाहिराती प्रसिद्ध झाल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
या जाहिरातीमध्ये शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमान, पिकाला हमीभाव, भावांतर योजना, लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये, रोजगार, कांदा निर्यात बंदी आदी विविध मुद्यांकडे जाहिराताच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
advertisement
शरद पवार गटाच्या या पावलामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होणारी राजकीय चकमक आणखी तीव्र होणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पवार गटाचे आज शिबीर...

सोमवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शरद पवार गटाच्या या शिबीराकडे पाहिले जात आहे. नाशिकमधील मोर्चादेखील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जात आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP Sharad Pawar : ''देवा भाऊ” नंतर 'देवा तूच सांग...’' शरद पवार गटाच्या जाहिरातीने राजकारण तापलं!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement