Sourav Ganguly : कोण आहे उत्तम साहा? ज्याच्यावर सौरव गांगुलीने ठोकला 50 कोटींचा मानहानीचा दावा
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली सध्या चांगलाच संतापला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचा विद्यमान अध्यक्ष गांगुलीने कोलकात्याच्या लालबाजारमध्ये उत्तम साहा यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे.
कोलकाता : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली सध्या चांगलाच संतापला आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचा विद्यमान अध्यक्ष गांगुलीने कोलकात्याच्या लालबाजारमध्ये उत्तम साहा यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला आहे. सौरव गांगुलीने साहाकडून 50 कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली आहे. साहाच्या विधानांमुळे प्रतिमा मलिन झाली आहे. माझ्यावरील आरोप निराधार आहेत आणि आपला याच्याशी काहीही संबंध नाही, असं गांगुली म्हणाला आहे. गांगुलीने साहाच्या विधानांना अपमानजनक आणि बदनामीकारक म्हटले आहे. लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमासाठी स्टेडियममध्ये मी पाहुणा म्हणून होतो आणि त्याचा कार्यक्रम आयोजकांशी काहीही संबंध नव्हता, असं वक्तव्य गांगुलीने केलं आहे.
हे प्रकरण लिओनेल मेस्सीच्या 13 डिसेंबरच्या कार्यक्रमाशी संबंधित आहे. अर्जेंटिनाचा फुटबॉल दिग्गज मेस्सी शनिवारी लेक सिटी स्टेडियममध्ये पोहोचला, जिथे प्रेक्षकांनी गोंधळ घातला. चाहत्यांनी स्टेडियमची तोडफोड केली ज्यामुळे गोंधळ उडाला. नंतर, अर्जेंटिना फॅन क्लबचे अध्यक्ष उत्तम साहा यांनी सौरव गांगुलीवर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सतद्रु दत्त यांच्या कारभारात "मध्यस्थ" म्हणून काम केल्याचा आरोप केला, यावरून गांगुली संतापला. गांगुली म्हणाला की त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे त्याची वैयक्तिक प्रतिष्ठा दुखावली गेली आहे. हे जाणूनबुजून केले गेले आहे.
advertisement
लाल बाजार येथे दाखल केलेल्या तक्रारीत सौरव गांगुली म्हणाला की, 'उत्तम साहाच्या विधानांमुळे माझ्या प्रतिमेला मोठे नुकसान झाले आहे. हे आरोप कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर करण्यात आले आहेत. मी साहाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि आता त्याच्याविरुद्ध 50 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. माझ्यावरील आरोप निराधार आहेत आणि त्यांना कोणताही आधार नाही.'
advertisement
लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमाच्या दिवशी, गांगुली स्टेडियमच्या एका वेगळ्या भागात उपस्थित होता. चाहते अधिकाधिक बेशिस्त होत असल्याचे पाहून तो निराश होऊन निघून गेला. या घटनेनंतर, गांगुली स्वतः म्हणाला की तो कार्यक्रमात पाहुणा म्हणून आला होता आणि त्याचा आयोजकांशी कोणताही संबंध नाही. गांगुलीच्या वकिलांनी सांगितले की, भविष्यात कोणीही असे खोटे आरोप करू नयेत म्हणून उत्तम साहावर ही कारवाई करण्यात आली आहे.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
Dec 18, 2025 11:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sourav Ganguly : कोण आहे उत्तम साहा? ज्याच्यावर सौरव गांगुलीने ठोकला 50 कोटींचा मानहानीचा दावा










